शाहरुख खान धमकी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर, संशयीताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
जयदीप मेढे November 12, 2024 01:43 PM

Shahrukh Khan Death Threat Update: अभिनेता शाहरुख खानला धमकी प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात अभिनेता शाहरुख खानला आलेल्या धमकी प्रकरणात रायपुरमधून एका संशयित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फैजान खान असं या संशयित व्यक्तीचं नाव असून मुंबई पोलिसांनी आज सकाळी या व्यक्तीला धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याला धमकी दिल्या प्रकरणात फैजान खान याला अटक करण्यासाठी ट्रांसिट डिमांड घेण्यासाठी मुंबई पोलीस सकाळी रायपुरमध्ये पोहोचले होते. 

गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळी कडून सलमान खानला धमक्या येत असतानाच शाहरुख खान ला आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली होती. शाहरुखला दिलेल्या धमकी प्रकरणात संशयित असणाऱ्या रायपूरच्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून आज सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयात त्याला ट्रांजिट रिमांडसाठी देण्यात येणार आहे.

न्यायालयातून बांद्रा पोलीस ठाण्यात नेण्यात येणार 

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याला धमकी दिल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या फैजान खान याला आज सकाळी 11 वाजता मुंबई पोलीस जिल्हा न्यायालयात सादर करणार आहेत. ट्रांजिट रीमंडसाठी या संशयताला जिल्हा न्यायालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला लगेचच बांद्रा पोलीस ठाण्यात नेतील असं सांगण्यात येतंय. 

जबाब नोंदवण्यासाठी 14 ला येणार होता मुंबईत

बांद्रा पोलीस ठाण्यात आपला जबाब देण्यासाठी 14 तारखेला फैजान खान याला मुंबईत आणण्यात येणार होतं. परंतु गेल्या दोन दिवसांपासून अभिनेता शाहरुख खानला अनेक धमक्या मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेच्या कारणांचा उल्लेख करत ऑनलाइन पद्धतीने आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी विनंती फैजान याने केली होती. दरम्यान फैजांच्या जबाबवर  मुंबई पोलीस संतुष्ट नसल्याचे ही सांगण्यात येत आहे.

शाहरुखला अंडरवर्ल्डची धमकी?

सुपरस्टार अभिनेता सलमान खानला गेल्या वारंवार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमक्या येत असतानाच आता अभिनेता शाहरुख खानलाही धमकीचा फोन आला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कलम 308(4), 351(3)(4) बीएनएस अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शाहरुख खानला अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याच्यावर दबावही टाकण्यात आला, पण किंग खानने कोणतीही भीती न बाळगता त्या कठीण परिस्थितीचा सामना केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.