Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला ब्रेक; वाहनधारकांच्या तक्रारीवरून MSRDC ची कारवाई
Saam TV September 25, 2024 12:45 AM

बुलढाणा : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर ठिकठिकाणी टोल नाके लावण्यात आले आहेत. दरम्यान महामार्गावर टोल वसुलीची रक्कम मोठी असूनही टोल नाक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाहन धारकांच्या होत्या. या तक्रारींची दाखल घेत एमएसआरडीसीने तोल वसुली करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.    

नागपूर ते मुंबई असा नव्याने तयार अरण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) वाहनांची वर्दळ खूप आहे. दरम्यान या महामार्गावरून वापरणाऱ्या वाहन धारकांकडून टोल वसुली केली जाते. यासाठी एका एजन्सीला तोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवसभरात होत असलेल्या टोल वसुलीची रक्कम देखील मोठी आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा मिळत नाही. यामुळे टोल कलेक्शन करणाऱ्या या एजन्सी विरुद्ध अनेक तक्रारी एमएसआरडीसीकडे आल्या होत्या. या तक्रारीत टोल नाक्यावर (Toll Plaza) शौचालयाचा अभाव, तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर न मिळणे, टोल वसुली कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक या विषयी या तक्रारी होत्या. 

Sangli News : शिराळ्यात आढळला जगातील सर्वात मोठा दुर्मिळ पतंगा; जाणून घ्या सविस्तर

६९ नोटीसीनंतर कारवाई 

सदर तक्रारीच्या अनुषंगाने एमएसआरडीसीने टोल वसुली करणाऱ्या रोडवेज सोल्युशन्स या कंपनीला तब्बल ६९ नोटिस बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही सदर एजन्सीकडून सुधारणा करण्यात आली नाही. सुधारणा न झाल्याने एमएसआरडीसीने या कंपनीचा ठेकाच आता रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करूनही वाहनधारकांना सुविधा मिळत नसल्याची अद्यापही वाहनधारकांची ओरड कायम आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.