हवाई हल्ल्यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा लेबनॉनच्या लोकांना संदेश
GH News September 25, 2024 01:08 AM

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली तळाला भेट दिली. यावेळी हिजबुल्ला विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षावर ही त्यांनी चर्चा केली. लेबनीज जनतेला त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि हिजबुल्लाहवरील कारवाईचे समर्थन केले. आमचे युद्ध तुमच्याशी नाही. तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा, असे आम्ही कालच सांगितले होते असे नेतन्याहू म्हणाले. पीएम नेतन्याहू म्हणाले की, “आमची लढाई तुमच्या लोकांच्या विरोधात नाहीये, आमची लढाई हिजबुल्लाहविरुद्ध आहे. नसराल्ला हे तुम्हाला विनाशाकडे घेऊन जात आहे. राहण्याच्या खोलीत क्षेपणास्त्रे आणि रॉकेट आहेत. गॅरेजमध्ये, ते स्वत: ला हिजबुल्लाह आणि नसराल्लाहच्या तावडीतून मुक्त करणार नाहीत, ते तुमच्याच भल्यासाठी आहे.”

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. तर हिजबुल्लाह देखील सतत त्यांच्यावर बॉम्बफेक करत आहे. नुकत्याच झालेल्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांनंतर इस्रायलने हिजबुल्लाविरुद्ध मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत. सातत्याने रॉकेट-क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केलंय.

इस्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक कमांडरचा खात्मा केला आहे, इस्रायलकडून सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. दुसरीकडे, हिजबुल्लाहकडून देखील रॉकेट हल्ले होत आहेत. आतापर्यंतच्या संघर्षात हिजबुल्लाला धक्का बसला आहे. या हल्ल्यामुळे आणि प्रतिहल्ल्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे.

या युद्धामुळे तेल उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. मध्यपूर्वेत लेबनॉनचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे या युद्धाचे जागतिक व्यापारावरही परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत जगाला पुन्हा महागाईचा सामना करावा लागू शकतो.

गाझामध्ये इस्रायलचा हमास विरुद्ध दुसरीकडे संघर्ष सुरु आहे. हमासला संपवण्यासाठी इस्रायलकडून सतत हल्ले सुरु आहेत. हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करुनच थांबणार असे इस्रायलने आधीच स्पष्ट केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.