सिध्दिविनायक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी खाड्ये
esakal September 25, 2024 02:45 AM

टीपः swt2431.jpg मध्ये फोटो आहे.

सहदेव खाड्ये

सिद्धिविनायक नवरात्रोत्सव
मंडळाच्या अध्यक्षपदी खाड्ये
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाड्ये यांची फेरनिवड करण्यात आली. कासार्डे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सल्लागार संजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी अभिजित शेटये, राकेश मुणगेकर, सचिव सचिन राणे, सहसचिव रुपेश कानसे, खजिनदार राहुल उर्फ राजू शेटये, सहखजिनदार वैभव माळवदे यांच्यासह कार्यकारिणी सभासद व सल्लागार यांचीही निवड करण्यात आली. सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळातर्फे यावर्षी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, दिंडी भजन स्पर्धा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या बैठकीस सल्लागार संजय देसाई, श्रीपत पाताडे, राजेंद्र सावंत, संतोष पारकर, प्रवीण पोकळे, सत्यवान केसरकर, किशोर कुडतरकर, प्रकाश तिर्लोटकर, बाळा जोशी, रमेश मुणगेकर, डॉ. किरण गुजर, गुरुप्रसाद सावंत, संतोष राणे, नवनाथ तोरस्कर, निखिल पिसे, सुधीर रजपूत, बाबा चव्हाण, हेमंत मालणकर, नीलेश पवार यांच्यासह सल्लागार, कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.