Share Market Closing: शेअर बाजार सपाट बंद; सेन्सेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग, कोणते शेअर्स सर्वात जास्त वाढले?
esakal September 25, 2024 04:45 AM

Share Market Closing Latest Update 24 September 2024: भारतीय शेअर बाजार सपाट व्यवहारासह बंद झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते. परंतु दोन्ही निर्देशांकांनी आज विक्रमी पातळी गाठली होती. आज निफ्टीने 26,011 च्या विक्रमी पातळीला तर सेन्सेक्सने 85,163 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला.

या व्यतिरिक्त निफ्टी बँकेने 54,247 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. परंतु बंद होण्याच्या वेळी निफ्टी 25,940 वर सपाट बंद झाला आणि सेन्सेक्स 14 अंकांनी घसरला आणि 84,914 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 137 अंकांनी घसरून 53,968 वर बंद झाला.

टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी टाटा स्टीलच्या शेअर्सनी आज सर्वाधिक 4.32 टक्के वाढ नोंदवली. याशिवाय पॉवर ग्रिडचे शेअर्स 2.70 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 1.88 टक्क्यांनी, एचसीएल टेक 1.49 टक्क्यांनी वाढून बंद झाले.

महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले.

हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स घसरणीसह बंद झाले

दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स आज सर्वाधिक 2.46 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 1.54 टक्के, इंडसइंड बँक 1.16 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.13 टक्के आणि टायटन 1.00 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

याशिवाय नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सही घसरले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.