शाश्वत भारत सेतू प्रदर्शनाचे आयोजन
esakal September 25, 2024 05:45 AM

पुणे, ता. २४ : ‘रोटरी इंटरनॅशनल प्रांत ३१३१ थे १३ क्लब’ व ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ यांच्या वतीने शुक्रवारी व शनिवारी (ता. २७ व २८) शाश्वत भारत सेतू प्रदर्शनाचे आयोजन केले आहेत. कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमध्ये असलेल्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी पाच दरम्यान प्रदर्शन पार पडेल.
नेट झिरो (कार्बन, पाणी, ऊर्जा आणि कचरा), वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हरित प्रक्रिया, ग्रीन बिल्डिंग, अपसायकलिंगद्वारे मूल्यवर्धित उत्पादने, पाणी आणि ऊर्जा कमी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांसह सर्वांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी प्रदर्शन डिझाइन केले आहेत. जल व ऊर्जा पदचिन्ह, बायोमासपासून ऊर्जा, शाश्वत जीवनमान आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम यावर प्रदर्शनाद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे. प्रदर्शनातून स्टार्टअपसाठी अनेक संकल्पना, तंत्रज्ञान आणि उत्पादने फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.