Karmala News : आमदार संजय शिंदेंना तीन हजार कोटी निधी दिला, त्यांना पुन्हा एकदा आमदार करा: अजित पवार यांचे आवाहन
esakal September 25, 2024 08:45 AM

करमाळा - तुमचे आमदार संजय मामा शिंदे यांना तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला 3 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मधल्या काळात कोरोना सारखे आजार आले नसते तर तुमच्या मतदारसंघाला 5000 कोटी रुपये निधी दिला असता. तुम्ही पुन्हा एकदा संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभारावा. तुमच्या मतदारसंघाला काहीही कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंञी अजित पवार यांनी केले. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक आहेत.

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या विचारात असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी पुन्हा एकदा आमदार संजय शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ते करमाळा येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन व जनसमान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात झरे (ता. करमाळा) येथे बोलत होते.

यावेळी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, महिलांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख रूपालीताई चाकणकर, यशवंत शिंदे, तालुका अध्यक्ष भरत अवताडे,

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, तुमचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला त्यावेळी सांगितले की, मला मंत्रिपद नको किंवा अन्य काहीही नको फक्त माझ्या मतदारसंघाला निधी कमी पडू देऊ नका ही मागणी केली. आणि संजय मामा शिंदे यांनी सर्वाधिक निधी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला.

पुन्हा एकदा आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहावा. राहिलेली विकास कामे तात्काळ पूर्ण केली जातील. दहिगाव उपसा सिंचन योजना मागणी केलेल्या गावाचा समावेश करण्यात येईल. तसेच कुकडी- उजनी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यात येईल. यासाठी पुन्हा एकदा संजय मामा शिंदे यांना आमदार करा असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार संजय शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर हाताने निधी दिला आहे. करमाळा शहराच्या विकासासाठी देखील चांगला निधी मंजूर करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.