Amit Shah: विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकू, नागपुरातील मेळाव्यात अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
Saam TV September 25, 2024 10:45 AM

नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. शरद पवारांना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा जिंकाव्या लागतील, असं शाहांनी म्हटलंय. शरद पवार आणि ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य असल्याचंही अमित शहांनी सांगितलंय. विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्रात सरकार येईल. हेही शहा यांनी आवर्जून नमूद केलं. याशिवाय प्रत्येक बुथवर 10 टक्के मतं वाढवा असंही शहांनी म्हटलंय.

'सत्तेचा रस्ता विदर्भातून जातो'

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, ''सत्तेचा रस्ता विदर्भातून जातो. शरद पवार यांना रोखायचं असेल, तर 45 जागा जिंकाव्या लागतील. प्रत्येक बुथवर 10 टक्के मत वाढवा, विदर्भात 45 जागा जिंकलो तर महाराष्ट्रात सरकार बसेल.''

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report अमित शहा यांच्या भाषणातील, महत्वाचे मुद्दे...
  • भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान बूथ कार्यकर्ते आणि संघटना आहे.

  • निवडणुका जवळ आल्या की, इतर राजकीय पक्ष सभा आणि रोड-शो करण्यास सुरुवात करतात, पण भाजप आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करते.

  • विदर्भात भाजपची मजबूत स्थिती आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल.

  • भाजपचे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रस्थापित व्हावा, याशिवाय भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम करतात.

  • राहुल गांधी अमेरिकेत बोलून आले की, विकास झाल्यावर आरक्षण संपवलं जाईल. पण भाजप, असं होऊ देणार नाही.

Maharashtra Politics: दादांच्या एक्झिटसाठी भाजप-सेनेचा प्लॅन? विधानसभेत अजित पवारांना एकटं लढावं लागणार? वाचा...

आपल्या विभागातील सर्व सहकारी संस्थांना भेट द्या आणि शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी हिता संबंधित सर्व योजनांची माहिती द्या, असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.