Khamgaon News : खामगाव येथे श्री हरी लॉन्सला भीषण आग; सिलेंडरचे स्फोट होत असल्याने नागरिक दहशतीत
esakal September 25, 2024 08:45 AM

खामगाव - येथील खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा स्थित असलेल्या श्रीहरी लॉन्स च्या गोडाऊनला आज रात्री १० वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सिलेंडरचे देखील स्फोट झाल्याची माहिती असून नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव नांदुरा रोडवर असलेल्या श्रीहरी लॉन्स चे गोडाऊन ने मंगळवारी रात्री अचानक पेट घेतला. बघता बघता हे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून धुराचे लोट संपूर्ण सुटाळा गावासह खामगाव शहराकडे पसरले. गोडाऊन मधील साहित्य, आचारी सामान, मंडप जळून आग आणखी भीषण होत चालली आहे.

दरम्यान सदर गोडाऊन मध्ये काय सिलेंडरही होते. यातील दोन ते तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली असून होणाऱ्या स्फोटांच्या आवाजामुळे नागरिक दहशतवादी खाली वावरत आहेत. घटनेची माहिती मिळताच खामगाव, नांदुरा, शेगाव सह जिल्हाभरातून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले आहे.

यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी घटनास्थळाकडे गाव घेतली होती. तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस सुद्धा घटनास्थळी हजर असून लक्ष ठेऊन आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.