Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
esakal September 25, 2024 06:45 AM
पक्षचिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्याच्या निर्णयाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Akshay Shinde Encounter Live: अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात

एन्काऊंटरमध्ये मृत झालेल्या अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अजूनही बॉडी ताब्यात घेण्यासाठी अक्षयचे नातेवाईक आलेले नाहीत.

Nagpur Live : अमित शहा नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती - काँग्रेस

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आज नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी मोठ्या घोषणा करतील. आम्हाला केंद्र आणि राज्य सरकार द्या आम्ही वेगळा विदर्भ करू, धनगरांना आरक्षण देऊ, कापसाला भाव देऊ, सर्व पिकांना दीडपटीने एमएसपी देऊ असे म्हणत होते. एवढ्या मोठ्या विश्वविख्यात पक्षाचे नेते आले आणि काय करून गेले तर बुथवरची चर्चा करून गेले. विदर्भाची पुन्हा उपेक्षा केली, येणाऱ्या निवडणुकीत स्टार प्रचारक असलेले अमित शहा आणि मोदीजी महायुतीला कसा फायदा करून देतात हे तुम्ही पाहाच.

Mumbai Live : पॉक्सो प्रकरणातील २२ वर्षीय तरुणाचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू

२२ वर्षीय तरुणाचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू. १६ सप्टेंबरला झाली होती आरिफ कुरेशीला पॉक्सो प्रकरणात अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असताना अत्यवस्थ झाल्याने रुग्णालयात भरती करावं लागलं. त्यानंतर दोन दिवसात जे जे रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. काळाचौकी पोलीस ठाण्याला स्थानिकांनी घेराव घातला.

Badlapur Encounter Live Updates: शिवसेना नेते संजय निरुपम यांचा विरोधकांना प्रश्न

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या कथित एन्काउंटरवर शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, माझा विरोधकांना प्रश्न आहे की, बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला तेव्हा पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असे तुम्हाला वाटत नाही का?

Amit Shah Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं दोन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यासाठी नागपुरात आगमन.

Nagpur Live: नागपूर- शंकरनगर स्टेशनजवळ मेट्रो रुळावरच बंद

तांत्रिक कारणामुळे नागपूर येथील मेट्रो शंकरनगर येथील रुळावरच बंद पडली. सीताबर्डी कडे जाणाऱ्या मार्गावर ही मेट्रो बंद पडली. त्यानंतर सर्व प्रवाशांना ट्रॅकवरच बाहेर काढण्यात आलं.

Ajit Pawar Live: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे ह नराधम होता, त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर संतप्त होते. महिला असुरक्षित म्हणून विरोधक ओरडत होते. त्या विकृताने पोलीसाचे हत्यार घेवून पोलिसांवर फायारींग केले त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला मारला मी समर्थन करीत नाही त्याची चौकशी होईल. मात्र, आता याचे राजकारण विरोधक करत आहेत. मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नीही विकृत म्हणते, असं अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Manoj jarange Live: मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांनी फोडला टाहो

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आता मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली असून त्यांनी उपचार घेण्याची विनंती महिला आंदोलकांकडून केली जात आहे.

Akshay Shinde Encounter Live: बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका

बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटवर ठाणे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. एन्काऊंटर हा सर्वोच्च न्यायालयाच्या मते खून आहे असं म्हणत आता, याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे .

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक: याचिकाकर्त्यांनी याचिका घेतली मागे

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची याचिका न्यायालयाने बेसलेस असल्याचे नमूद केले. याचिकाकर्त्यांना कोर्टाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले की, "तुम्ही प्रकरण स्वतः मागे घ्या किंवा आम्ही हे प्रकरण डीसमिस करू." कोर्टाने याचिकाकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया वेळेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर याचिकाकर्त्यांनी शेवटी आपली याचिका मागे घेतली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पुढे जाणार आहे.

Crime Update Live: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: सीबीआयने घेतली तपासाची जबाबदारी

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपासाची जबाबदारी हाती घेतली आहे. या प्रकरणात आरोपी मॉरीस नोरोन्हा विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोसाळकर कुटुंबीयांनी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा आरोप केला असून, सीबीआय याच दिशेने तपास करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बोरिवली येथे फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी मॉरीसने आत्महत्या केली होती. याआधी या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत होती, परंतु घोसाळकर यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात विशेष तपासाची मागणी केली होती.

Maratha Reservation live: मराठा कार्यकर्त्याने तहसीलदाराच्या खुर्चीला लावली आग

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे, यामुळे मराठा समाजात मोठा असंतोष दिसून येत आहे. याच दरम्यान, मराठा तरुण मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांच्या खुर्चीला आग लावून आपला संताप व्यक्त केला आहे.

MUDA Scam Live: मुडा जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दणका

मुडा जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. राज्यपालांची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

Salman Khan Live: राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

अभिनाता सलमान खान याच्या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गॅलेक्सी निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान सलमान आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे काय कारण आहे, याबाबत अद्याप कारण कळू शकले नाही.

D Gukesh Live: दोन सुवर्णपदके जिंकणारा गुकेश मायदेशी दाखल

बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारतासाठी दुहेरी सुवर्णपदक जिंकल्यानंतर बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेश चेन्नई विमानतळावर दाखल झाला आहे.

Pune Live News: पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वर मिळणार पाणी आणि चहा

पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर पाणी आणि चहा मिळणार आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आता हे मिळणार आहे.

Akshay Shinde Crime Live : अक्षय शिंदेचा मृतदेह जेजे रुग्णालयात पोहचला

अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयात पोहचली आहे. या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Mumbai Rain Live: पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील महिनाभरापासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच आज मुंबई उपनगरात जोरदार पाऊस सुरू

Amit Shah Live : अमित शहा साधणार मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असून, एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ते मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Nagpur Live: नागपुरात मुसळधार पावसाला सुरवात

नागपुरात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज हवामान विभागकडून विदर्भात ऍलो अलर्ट दिला आहे.

Badlapur Case LIVE : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस गोळीबारात मृत्यू; बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मिठाईचे वाटप

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाण्यातील बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप केले.

Badlapur Case Update : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस गोळीबारात मृत्यू, न्यायाधीशांच्या उपस्थितीत मृतदेहाचा केला पंचनामा

बदलापूर अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा काल बदलापूर, ठाणे येथे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. काल रात्री त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले आणि आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम जेजे रुग्णालयातील तज्ञ, तसेच फॉरेन्सिक टीम करतील.

Jammu and Kashmir Election LIVE : जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांसाठी उद्या मतदान, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त

उद्या, 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी राजौरी जिल्ह्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.

Badlapur Case Update : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तातडीचा दिलासा देण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केलीये. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

Mahabodhi Express LIVE : प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक; अनेक प्रवासी जखमी

प्रयागराज : काल रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या महाबोधी एक्सप्रेस ट्रेनवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयागराज जंक्शनहून गयाकडे निघालेल्या या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे कळतंय.

Mumbai University Senate Election LIVE : मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज (मंगळवार 24 सप्टेंबर) मतदान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय.

Mumbai Rain LIVE : मुंबई-ठाणे महामार्गावर पावसाचा जोर वाढला

राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून मुंबईच्या काही भागांतही जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई-ठाणे महामार्गावर पावसाला सुरुवात झालीये.

CM Siddaramaiah LIVE : 'मुडा' घोटाळाप्रकरणी आज निकाल शक्य; मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात?

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज (ता. २४) उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात, याबाबत तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

Governor C. P. Radhakrishnan LIVE : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता ते शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू

Latest Marathi Live Updates 24 September 2024 : महिनाभरापूर्वी बदलापूर येथे शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. तसेच राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध पुरवणाऱ्या दूध उत्पादकांना आता पाचऐवजी सात रुपये अनुदान दिले जाणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत असून काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.