Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे 'एन्कांऊटर' प्रकरणात मोठी अपडेट
Sarkarnama September 25, 2024 04:45 AM

बदलापूरच्या शाळेतील 2 विद्यार्थीनींवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केले जात आहे.

अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर फेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करणार असल्याची माहिती आहे.

अक्षय शिंदे यांचा एन्कांऊटर नंतर बदलापूरमध्ये पेढे वाढण्यात आाले, फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे अक्षय शिंदे यांचे शवविच्छेदन जे. जे रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. लवकरच अक्षय शिंदे यांचा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.