70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
एबीपी माझा वेब टीम September 25, 2024 03:13 PM

Gold Rates : न्यूयॉर्कपासून नवी दिल्लीपर्यंत म्हणजेच अमेरिकेपासून भारतापर्यंत सोन्याच्या किंमतीत वेगानं वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव (Gold Rate) सध्या 76 हजार रुपयांवर पोहोचला आहे. प्रथमच सोन्याच्या दरात एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसांत सोन्याच्या दरात 2,900 रुपयांची वाढ झाली आहे.

जेव्हापासून यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे, तेव्हापासून परदेशी बाजारातून भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये गेल्या 5 दिवसांत सोन्याच्या किमतीत 2,900 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या किमतीने 70 दिवसांनंतर MCX वर नवा विक्रम केला आहे. शेवटच्या वेळी 17 जुलै रोजी सोन्याने आयुष्यमान उच्च विक्रम केला होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडने केवळ 50 बेसिस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे भू-राजकीय तणाव हेही सो

भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ

सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्यपूर्वेतील तणाव संपत नाही. त्यामुळं सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 70 दिवसांनंतर सोन्याच्या किमतीने एमसीएक्सवर नवा विक्रम केला आहे आणि तोही 76 हजार रुपयांसह. MCX वर सोन्याने 76 हजार रुपयांसह उच्चांकाचा नवा विक्रम केला आहे. 

सोन्याच्या दरात तब्बल 2900 रुपयांची वाढ 

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 5 व्यापार दिवसात सोन्याच्या दरात 2900 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर 18 सप्टेंबरला सोन्याचा भाव 73,055 रुपये होता. जे बुधवारी वाढून 76,000 रुपये झाले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास चालू वर्षात सोन्याच्या किमतींनी गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 63,203 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. ज्यामध्ये आत्तापर्यंत 12,797 रुपयांची वाढ झाली आहे. 

सोन्या चांदीच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, एका बाजूला सोन्याचे दर वाढत असतानाच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो 90000 रुपयांच्या पातळीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळं येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rate : सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.