Raj Thackeray: राज ठाकरेंचं विदर्भाकडे विशेष लक्ष, पुन्हा करणार दोन दिवसांचा दौरा
esakal September 25, 2024 04:45 PM

Latest Amravati News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे.

पक्षाकडून ‘मिशन विदर्भ’ हाती घेण्यात आले असून विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक २७ व २८ सप्टेंबरला अमरावतीला होऊ घातली आहे. या बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त मनसेतर्फे खुली निबंध स्पर्धा

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती काय राहणार, याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. मागच्या महिन्यात (ऑगस्ट) मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर गणेशोत्सव संपताच राज ठाकरे पुन्हा एकदा अमरावती दौऱ्यावर येत आहेत.

२७ सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ; तर २८ ला पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी हॅाटेल ग्रॅण्ड महफिल येथे चर्चा करणार आहेत, अशी माहिती मनसेचे अमरावती शहराध्यक्ष धीरज तायडे व बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांनी दिली.

Raj Thackeray: "पाकिस्तानी कलाकारांना नाचवणं..."; फवाद खानचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा अमरावती स्टेशनवर होणार जंगी स्वागत

मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर येत असल्याने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शुक्रवारी (ता. २७) सकाळी साडेसातला अमरावती रेल्वेस्टेशनवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत सुद्धा करण्यात येणार आहे.

Raj Thackeray: जातपात अन् खोटी आश्वासनं... राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या जनतेला दुसऱ्या मुक्तिसंग्रामाची हाक, नेमकं काय म्हणाले?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.