मनोज जरांगे नवव्या दिवशी 'थांबले', उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा
रवी मुंडे, एबीपी माझा September 25, 2024 07:13 PM

जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर आत मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.