Drona Desai: 498 पेक्षा जास्त धावांची खेळी करणारे कोण, कोण आहे फलंदाज
GH News September 25, 2024 09:11 PM

क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा विक्रम घडत असतात. शालेय क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत होणाऱ्या विक्रमांकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले जाते. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याचा शालेय सहकारी विनोद कांबळी यांनी 24 फेब्रुवारी 1988 रोजी हॅरिस शिल्डमध्ये सेंट झेवियर्स विरुद्ध शारदाश्रम विद्या मंदिराकडून खेळताना 664 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. अजूनही त्या विक्रमाची चर्चा होते. आता गुजरातमधील अहमदाबादमध्ये असाच प्रकार घडला आहे. एका 18 वर्षीय क्रिकेटपटूने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. द्रोण देसाई असे या खेळाडूचे नाव आहे. द्रोण देसाई असे या खेळाडूचे नाव आहे. द्रोण देसाई याने दिवाण बल्लूभाई चषक अंडर-19 मल्टी-डे स्पर्धेत सेंट झेवियर्स स्कूलकडून खेळताना 498 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली.

320 चेंडूंचा सामना 498 धावा

जेएल इंग्लिश स्कूलविरुद्धच्या सामन्यात द्रोण देसाई याने 320 चेंडूंचा सामना केला. त्यात त्याने 86 चौकार आणि 7 षटकारही मारले. विक्रमी खेळी खेळूनही त्याने निराशा केली. कारण त्याला केवळ 2 धावांमुळे 500 धावांचा टप्पा गाठता आला नाही. या मॅरेथॉन खेळीने त्याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एवढी मोठी धावसंख्या गाठण्यासाठी खेळाडूंच्या विशेष यादीत टाकले.

सेंट झेवियर्स संघाच्या 842 धावा

23 सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूलने 26 धावांत दोन गडी गमावले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर द्रोण खेळण्यासाठी आला. त्याने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याने हेत देसाईबरोबर 350 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर कर्णधार विराट तलाटीबरोबर 188 धावा केल्या. यामुळे त्यांचा संघ 842 धावा करु शकला.

712 धावांनी सेंट झेवियर्सचा विजय

द्रोण देसाईच्या या दमदार खेळानंतर मैदानात आलेल्या जेएल इंग्लिश संघाची अवस्था बिकट झाली. जेएल इंग्लिश संघाने पहिल्या डावात अवघ्या 40 धावा केल्या. दुसऱ्या डावात 92 धावा केल्या. त्यामुळे झेवियर्स संघाने एक डाव आणि 712 धावांनी विजय मिळवला.

या पाच खेळाडूंच्या सर्वाधिक धावा

498 धावा करणारा द्रोण देसाई एका खास क्लबमध्ये पोहचला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडूंच्या यादीत तो आला आहे. मुंबईचे प्रणव धनवाडे (नाबाद 1009), पृथ्वी शॉ (546), डॉ. हवेवाला (515), चमनलाल (नाबाद 506) आणि अरमान जाफर (498) या पाच जणांना एकाच डावात 498 किंवा त्यापेक्षा जास्त धाव केल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.