Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी
Marathi September 25, 2024 03:25 PM

लैंगिक शोषणाच्या आरोपाने मल्याळम फिल्म इंडस्ट्री संपूर्णपणे हादरली आहे. यामध्ये आता मल्याळम सिनेसृष्टीतले अभिनेते सिद्धीकी यांचेही नाव समोर आले आणि चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. मल्याळम इंडस्ट्रीतले हे मोठे स्टार असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धीकी यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करत अरेस्ट वॉरंट जारी केला आहे.

उच्च न्यायालयाने मंगळवारी अभिनेते सिद्धीकी यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांच्याविरोधात एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ज्यामध्ये संबंधित प्रकरणात जामीन मागण्यात आला होता. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. आता सिद्धीकी बेपत्ता असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सिद्धीकी यांच्याविरोधात हा निर्णय लैंगिक छळाच्या घटनांसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीद्वारे सुरू असलेल्या विशेष तपासाचा एक भाग म्हणून आला आहे. या प्रकरणी तिरुवनंतपुरममध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

काही दिवसांपूर्वी मल्याळम सिनेमातून हेमा कमिटी अहवालाअंतर्गत अनेक खुलासे समोर आले. यामध्ये इंडस्ट्रीतले प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक निशाण्यवर आले. याच समितीअंतर्गत सिद्धीकी यांच्याविरोधात एका अभिनेत्रीने आरोप केला होता. त्यामध्ये 2016 जानेवारी रोजी मस्कतच्या हॉटेलमध्ये एका अभिनेत्रीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

सिद्धींकींना मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळल्याने पीडित अभिनेत्रीने सार्वजनिकरित्या येऊन सांगितले. मी फक्त प्लस टू पूर्ण केले होते, ज्यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मला ते फेक अकाऊंट असल्याचे वाटले. मात्र कालांतराने ते त्यांचेच अकाऊंट असल्याचे कळले. त्यांचा सिनेमा सुखामायीरिकत्ते याचा प्रिव्ह्यू शो संपला होता. त्यानंतर त्यांनी मस्कत हॉटेलमध्ये चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी ती 21 वर्षांची होती.

अभिनेत्री म्हणाली, त्यांनी मला मुलगी बोलून बोलावले. ज्यावेळी मी तिथे गेले, त्यावेळी त्यांनी माझा लैंगिक छळ केला. मात्र सुदैवाने मी तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले. सिद्दीकी एक नंबरचे गुन्हेगार आहेत. त्यांनी स्वतःला आरशात पाहिले तर त्यांचे खरे रुप दिसेल. मी त्यांच्यामुळे माझी स्वप्न आणि मानसिक स्वास्थ्य हरवून बसले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.