निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी; ट्रॅव्हिस हेडचा इंग्लंडला दणका, मालिका खिश्यात
Marathi September 30, 2024 11:24 AM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेत कांगारुंनी मालिकेवर कब्जा केला. निर्णायक सामन्यात यजमान संघात वाईट रित्या पराभव झाला. 2-2 अश्या स्थितीत असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाचव्या सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. ब्रिस्टल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात 309 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 20.4 षटकात 165/2 असताना पाऊस आला. ज्याचा फायदा कांगारुंना झाला. सतत येत असलेल्या पावसामुळे सामना होऊ शकला नाही. परिणामी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 49 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत होता. ढगाळ वातावरण असल्याने त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. सॉल्टने 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तर बेन डकेटने 91 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावांची शानदार खेळी केली.

तर मिडल ऑर्डरमध्ये विल जॅक फ्लॉप ठरला त्याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हॅरी ब्रूकने दमदार खेळी केली. त्याने 52 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 72 धावांची शानदार खेळी केली. गेल्या सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. खालच्या फळीत आदिल रशीदने 36 धावा करत संघाला फिनीशींग टच दिले. आशाप्रकारे यजमान संघाने धावसंख्या 300 च्या पुढे नेली. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम गोलंदाजी करत 6.2 षटकांत 28 धावांत 4 बळी घेतले.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 7.1 षटकांत 78 धावांची भागीदारी केली. शॉर्टने 30 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. हेडने 26 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने सावधानीने 48 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. तर यष्टीरक्षक जोश इंग्लिशने 20 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. आशाप्रकारे रोमांचक मालिकेवर ऑस्ट्रेलियाने 3-2 ने कब्जा मिळवले. डावखुऱ्या सलामीवीर फलंदज ट्रॅव्हिस हेडला मालिकावीर तसेच सामनावीर पुरस्कार देऊन गाैरव करण्यात आले.

हेही वाचा-

“ना ना म्हणत 10 हंगाम खेळेल”, धोनीच्या निवृत्तीबाबत केकेआरचा संघमालक शाहरुखचे मजेशीर विधान
सॅमसनसाठी महत्वाची असेल बांगलादेशविरुद्धची टी20 मालिका, संधी दवडल्यास संपेल कारकीर्द!
अपघातानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर आला मुशीर खान; तब्येतीबाबत म्हणाला, “मी आता…”


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.