पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
मिकी घई, एबीपी माझा September 30, 2024 05:13 PM

पुणे : रस्ते अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एसटी महामंडळाच्या बसचे (Bus) देखील सातत्याने अपघात होत असल्याचे दिसून येते. अनेकदा बसची दूरवस्था किंवा खराब रस्ता हे अपघाताचे मूळ कारण असते. आता, पुण्याच्या (Pune) भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना, बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील 42 किरकोळ जण जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. 

बस अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून किरकोळ दुखापत असणाऱ्या जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  भोर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी असणाऱ्या तिघांना उपचारासाठी भोरमधील खासगी रुग्णालयात दाखलं करण्यात आलं आहे. अपघातामधील या गंभीर जखमींना आयसीयू (अति दक्षता विभागात) ठेवण्यात आलंय. 

दरम्यान, घटना घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी प्रवाशांना त्वरित भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून काहींना डिस्चार्जही देण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.