राज्यातील आत्ताचे पोलीसखातं हे केवळ मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय; अनिसच्या डॉ. श्याम मानव यांची टीका
मनोज जयस्वाल, एबीपी माझा September 30, 2024 07:13 PM

Shyam Manav in Washim : गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली मात्र,आतापर्यंत पोलीसखातं असं केव्हाच वागलं नाही. आत्ताचे जे नवीन पोलीसखातं आहे  हे मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय, असा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख  डॉ. श्याम मानव (Shyam Manav)  यांनी केला आहे. वाशिमच्या (Washim) कारंजा लाड इथे रविवारी संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव अभियान अंतर्गत व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे- डॉ. श्याम मानव 

राज्यात गेल्या 42 वर्षांमध्ये मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या बाबांना एक्सपोज केलं आहे. पण या देशातील कोणत्याही राजकारण्यांना मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री कोणत्याही पदावर असो, त्यांनी कधीही या दरम्यानच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नाही. पोलिसांना पोलिसाचे काम करू दिलं.  आज त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागत आहेत, तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की, पाच सात वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनी ॲक्शन घेण्याऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाहीत, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा कळतो, त्याच मालकाचे सरकार का उलटून टाकू नये? का त्यांना बदलून टाकू नये? हे जे सध्याचे  सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. असा घणाघातही डॉ. श्याम मानव यांनी केला आहे. 

फसवणारे सरकार बदलल्या शिवाय गत्यंतर नाही - डॉ. श्याम मानव

ज्यांना कायद्याचं वटहुकूम जारी केले असताना आजचे नवीन सरकार आहे ते सरकार धिरेंद्रकृष्ण महाराज (बागेश्वर धाम) यांना राज्यभर घेऊन हिंडवत आलंय. हे लोक छत्रपती संभाजीनगर परीसरात खुलेआम लोकांची लुबाडणूक करत आहे. त्या महाराजांना केंद्रीय मंत्री घेऊन आले आहे. म्हणजे जो माणूस खुलेआम लोकांची लुबाडणूक करतो, स्वतःचे  साम्राज्य निर्माण करतो, सरकार मधले मंत्री त्यांना घेऊन हिंडतात. ज्या मंत्र्यावर, ज्या सरकारवर आपली जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, तेच मंत्री आता आपल्या निवडणुकीच्या वापरासाठी, निवडणुकीच्या यशाकरिता त्यांना सहकार्य करत आहेत. आपल्या माणसांना फसवणारे हे सरकार आम्ही बदलणार, त्याशिवाय गत्यंतर नाही. असं म्हणत डॉ. श्याम मानव यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

हे ही वाचा  

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.