Israel Hezbollah War: इस्त्रायलला आणखी एक यश, एअरस्ट्राइकमध्ये हमास कमांडर ठार
GH News September 30, 2024 09:13 PM

Israel Attack On Fateh Sherif: इस्त्रायल आणि लेबानान यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धात हिज्बुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा दोन दिवसांपूर्वी इस्त्रायलने खात्मा केले. इस्त्रायलचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. आता इस्त्रायलने आणखी एका कमांडरला संपवले आहे. इस्त्रायलने लेबनानमधील कमांडर फतेह शेरिफ याला ठार केले आहे. इस्त्रायल हवाईदलाकडून ही माहिती देण्यात आली. इस्त्रायलने म्हटले की, आम्ही हमासचा लेबनान शाखा प्रमुख फतेह शेरिफ याला संपवले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करुन घोषणा

आयडीएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, इस्त्रायलने सोमवारी लेबनानमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यात फतेह शेरिफ याला लक्ष्य करण्यात आले होते. तो अल-बास शरणार्थीच्या शिबिरात होता. या वेळी केलेल्या हल्ल्यात शेरिफ त्याच्या पत्नी अन् मुलांसह मारला गेला. तो हमासचा महत्वाचा कमांडर होता. हमासला हिजबुल्लाहसोबत जोडण्यात त्याची महत्वाची भूमिका होती.

शेरिफ याच्यावर अनेक जबाबदाऱ्या

शेरिफ याचे काम हमासमध्ये भरती प्रक्रियेपासून शस्त्रास्त्रे मिळवण्यापर्यंत होते. शेरिफ हा युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीचा सदस्यही होता. जिथे तिने लेबनॉनमधील UNRWA शिक्षक संघाच्या प्रमुख म्हणूनही काम केले, असे आयडीएफने म्हटले आहे. इस्त्रायलसाठी धोकादायक ठरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात आयडीएफ आणि आयएसए आपली मोहीम सुरुच ठेवणार आहे. युएनच्या एजन्सी फॉर पॅलेस्टिनी निर्वासितांनी याला दुजोरा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, हमासचा नेता फताह शेरिफ UNRWA द्वारे लेबनॉनमध्ये तैनात करण्यात आला होता. मात्र, शेरीफच्या राजकीय हालचालींचा तपास सुरू आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दोन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, हमास अन् हिजबुल्लाहविरुद्ध आमची मोहीम सुरूच राहणार आहे. या भागातील सर्व अतिरेक्यांना उद्धवस्थ केल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.