बुमराह आयपीएल लिलावात उतरला तर 'इतक्या' कोटींची लागेल बोली, हरभजनने वर्तवला अंदाज
Marathi October 01, 2024 02:24 AM

आयपीएलप्रेमींना सध्या 2025 हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाची उत्सुकता आहे. पुढील आयपीएल लिलावासाठी बीसीसीआयने अनेक नवे नियमही जाहीर केले आहेत. लिलावापूर्वी कोणतीही फ्रँचायझी 6 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकते. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवेल?, याकडे सर्वांच्या नजरा असतील. खेळाडूंच्या लिलावाच्या या चर्चेदरम्यान माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. जर जसप्रीत बुमराह स्वत: आयपीएल लिलावात उतरला तर त्याला 30 ते 35 कोटी रुपये मिळू शकतात, असा त्याचा दावा आहे.

जसप्रीत बुमराहच्या लिलावाबाबत हरभजन सिंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दोन पोस्ट केल्या आहेत. त्याने रविवारी (29 सप्टेंबर) आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘जर जसप्रीत बुमराहने त्याचे नाव लिलावासाठी दिले तर आपल्याला कदाचित आयपीएलची सर्वात मोठी बोली दिसेल. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का?’, असा सवालही त्याने विचारला आहे.

त्यानंतर सोमवारी (30 सप्टेंबर) त्याची रविवारची पोस्ट रिट्विट केली. यावेळी त्याने लिहिले की, ‘मला बुमराहवर माझे संभाषण सुरू ठेवायचे आहे. मला वाटते बुमराहला दरवर्षी 30-35 कोटी रुपये सहज मिळतील. सर्व 10 संघ बुमराहवर बोली लावतील. केवळ गोलंदाजीसाठी नाही, तर कर्णधारपदासाठीही तो दावेदार असेल.’

दरम्यान जसप्रीत बुमराह 2013 पासून आयपीएल खेळत आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली असून तो अजूनही याच संघाचा सदस्य आहे. 30 वर्षीय जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून 133 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सने प्रत्येक वेळी बुमराहला संघात कायम ठेवले आहे. पुढील हंगामासाठीही मुंबई इंडियन्स कोणत्याही परिस्थितीत बुमराहला रिलीज करू इच्छित नसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयसने वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत निवड समितीवर साधला निशाणा; लिहिले, “मेहनतीची…”
कोहलीच्या आरसीबीवर खूप रागावला होता धोनी, माजी खेळाडूने सांगितली आतली गोष्ट
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा मैदानावर दिसणार सचिनच्या बॅटची जादू, ‘या’ लीगमध्ये खेळणार


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.