Iran Attack on Israel : इतकं सांगूनही इराणने मोठी चूक केली, आता घनघोर युद्धाची सुरुवात का?
GH News October 02, 2024 01:07 AM

अखेर ज्या गोष्टीची शक्यता होती, तेच घडलय. दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इस्रायल आधीच गाजा पट्टी आणि लेबनान या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. आता इराण विरुद्ध मोर्चा उघडला जाऊ शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला आधीच इशारा दिला होता. पण इराणने ती चूक केलीय असा इस्रायलचा दावा आहे. इस्रायलवर मिसाइल हल्ला झाला आहे. ही मिसाइल्स इराणमधून आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलने जेरुसलेममधील नागरिकांना शेल्टरमध्ये आश्रय घेण्याच आवाहन केलं आहे. मध्य इस्रायलमध्ये सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. इराणने मिसाइल हल्ला केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. संपूर्ण देशभरात सायरने वाजू लागले आहेत. इराणकडून हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने आधीच वर्तवली होती.

इराणमधून रॉकेट हल्ला होत असून सर्व नागरिकांना बॉम्बपासून संरक्षण देणाऱ्या शेल्टरमध्ये आश्रय घेण्यास सांगण्यात आलं आहे. प्राण वाचवणाऱ्या मार्गदर्शक सूचना आधीच इस्रायलकडून आपल्या नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इराणने हल्ला केला, तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी इस्रायलने आधीच दिली होती.

(बातमी अपडेट होत आहे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.