श्रीदत्तदूध संस्थेचा 'कात्रज'तर्फे गौरव
esakal October 02, 2024 09:45 AM

खोडद, ता.३० : पुणे जिल्हा दूध सहकारी उत्पादक संघ कात्रज (पुणे) यांच्या वतीने सन २०२३-२४ या सहकार वर्षात सर्वाधिक पशुखाद्य खरेदी करणारी संस्था या पुरस्काराने हिवरेतर्फे नारायणगाव येथील श्रीदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेला शुक्रवारी (ता.२७) गौरविण्यात आले.

पुणे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अतिष शिंदे, संचालक सुरेश शिंदे, संतोष खोकराळे, विलास खोकराळे, गोरक्ष खोकराळे, गाहिना भोर, जालिंदर सोनवणे, अनिता थोरात, सविता भोर, वंदना भोर, चिमाजी गाडेकर, राजेंद्र भोर उपस्थित होते.
मागील ३६ वर्षांपासून श्रीदत्त दूध उत्पादक संस्था कार्यरत आहे. संस्था दररोज दोन वेळा दूध संकलन करून पुणे जिल्हा सहकारी दूध संघ कात्रज यांना नियमित दूध पुरवठा करत आहे.२०२३-२४ या सहकार वर्षात संस्थेला १० लाख ३९ हजार ७३ रुपये नफा झाला आहे.संस्थेचे २०२३ -२४ अखेरचे लेखापरीक्षण झाले असून, या लेखापरीक्षणात स्थेला ‘अ’ वर्ग देण्यात आला आहे.संस्थेने १८८७ पोती पशुखाद्य या वर्षात खरेदी केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अतिष शिंदे यांनी दिली.
दूध उत्पादक गवळ्यांची २५ बायोगासची मागणी झाली असून लवकरच हे बायोगॅस बसविण्यात येणार आहेत.या वर्षात संस्थेने गवळ्यांना एक रुपया दूध फरक देण्याचे ठरविले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.