Iran Attack on Israel : सुरक्षा प्रोटोकॉल पाळा, बाहेर भटकू नका..इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी विशेष ॲडव्हायजरी
GH News October 02, 2024 12:13 PM

इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. त्यातच आता इराणने देखील इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायलवर मिसाइल हल्ला झाला आहे. ही मिसाइल्स इराणमधून आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी विशेष ॲडव्हायजरी जारी केली आहे. या भागातील सद्यपरिस्थिती पाहता स्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिल आहे. देशांतर्गत अनावश्यक प्रवास टाळावा, शेल्टर हाऊसच्या जवळ रहावे, असेही सांगण्यात आले आहे. दूतावासातर्फे सध्या तेथील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, दूतावासाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा, असेही दूतावासातर्फे जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दूतावासाची हेल्पलाईन +972-547520711 +972-543278392

ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही ते या लिंकद्वारे (https://forms.gle/ftp3DEXgJwH8XVRdA) नोंदणी करू शकतात, असेही भारतीय दूतावासानेनमूद केले आहे.

इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणकडून 102 बॅलेस्टिक मिसाइल्स डागण्यात आल्याचा दावा इस्रायली फोर्सने केला आहे. IDF च्या सूचनेनंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत. विशेषतः मध्य आणि दक्षिण इस्रायलमधील लोकांना बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.

हिजबुल्लाह चीफ नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इस्रायलवर मोठा हल्ला होणार अशी आधीपासूनच शक्यता वर्तवण्यात येत होती. इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला होण्याआधीच इस्रायली फोर्सने शंका व्यक्त केली होती. इराणकडून मिसाइल लॉन्च होताच इस्रायलने आपलं सुरक्षा कवच आयरन डोम एक्टिव केलं आहे. इराणला या हल्ल्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील,असे इस्रायली लष्कर IDF च्या प्रवक्त्याने सांगितल्याचे द टाइम्स ऑफ इस्रायलने नमूद केले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इस्रायल उत्तर देईल. आम्ही बचाव आणि आक्रमणासाठी सतर्क आहोत. आम्ही इस्रायलच्या नागरिकांचे रक्षण करू,असेही इस्रायलच्या ने्त्यांनी सांगितले.

इस्रायलमध्ये अंदाधुंद गोळीबार

मंगळवारी जाफा स्टेशनपासून इस्रायलवरील हल्ल्याची सुरुवात झाली. दोन दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या फायरिंगमध्ये चौघांचा मृत्यू झाला. इस्रायली सुरक्षा यंत्रणा या हल्लेखोरांचा सामना करत असतानाच इराणकडून मोठा बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला झाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.