मावळातील १६ गावांत दरडप्रवण उपाय योजना राज्य शासनाकडून ३९ कोटींचा निधी उपलब्ध
esakal October 02, 2024 11:45 PM

तळेगाव दाभाडे, ता. २ ः आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील १६ गावांच्या दरड प्रवण क्षेत्रांत उपाययोजना करण्यासाठी सुमारे ३८ कोटी ९३ लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
आमदार शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मिळवला असून त्यामधून दरड प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे. ही कामे झाल्यानंतर अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळून दिलासा मिळणार आहे. वाउंड, वडेश्वर, फळणे, मालेवाडी, वाकसई-देवघर, आतवण, साई, वाकसाई, शिलाटणे, पांगळोली, पाटण भाजे, मोरवे, वेहेरगाव, तुंग या गावांत दरड रोखून ठेवणारी भिंत बांधण्याच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेच्यावतीने आभार मानले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.