Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा
Saam TV October 03, 2024 05:45 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगेंना रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज मिळणार असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे अंतरवालीत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात बैठकांचा धडाका सुरू लावणार आहेत.दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं नियोजन जरांगेंनी केलंय.

सगळ्यांनी एकत्र यावे नेत्यांच्या मागे फिरू नये. एखादा व्यक्ती समाजाचं मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचं विधानसभेचं जागावाटप ठरलं? शिवसेनेच्या बैठकीत आकडा झाला निश्चित; वाचा

दसरा मेळाव्याचं नियोजन कसं असणार आहे. याबाबतही मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 12 वाजता डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवालीत दसरा मेळाव्याचे नियोजन करणार. नारायगण गडावर जरांगेंचा दसरा मेळावा होणार. यासाठी 52 हजार स्वयंसेवक गडावर असणार आहेत. मराठा समाजाच्या आग्रहामुळे मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नारायणगडावर जेवणासह, वैद्यकीय सुविधांचीही सोय असणार आहे.

Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचं विधानसभेचं जागावाटप ठरलं? शिवसेनेच्या बैठकीत आकडा झाला निश्चित; वाचा

दरम्यान, सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केलं. यानंतर आता मनोज जरांगे पाटीलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातच आता मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केलीय.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा होतो.

तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही दसरा मेळावा घेतात. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेतात. तर पंकजा मुंडेंचाही दसरा मेळावा असतो. यात आता मनोज जरांगे पाटील यांची भर पडणार आहे. त्यातून ऐन विधानसभेच्या तोंडावर जरांगे समाजाला काय संदेश देणार आणि पुन्हा सरकारला घाम फोडणार का हेच पाहायचं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.