Singhara Benefits : उपवासालाच नाही तर रोज खा शिंगाडे
Marathi October 03, 2024 09:24 PM

नवरात्रीच्या उपवासात फराळामध्ये विविध पदार्थ खाल्ले जातात. उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी साबुदाण्याप्रमाणेच इतरही गोष्टींचा वापर केला जातो. त्यापैकी एक म्हणजे शिंगाडा. शिंगाडामध्ये व्हिटॅमिन-सी, मॅगनीज, प्रोटीन, थायमिन असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिंगाड्याला इंग्रजीत वॉटर चेस्टनट असेही म्हणतात. हिवाळी हंगाम सुरू होताच बाजारात शिंगाड्याची विक्री सुरू झालीय. हे असं फळ आहे, याच शिंगाड्याचं पीठ उपवासाला खाल्लं जातं. पण हंगामी ताजं फळ म्हणून याचं सेवन केल्यास तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. तर, शिंगाड्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

  • यूरिक अॅसिड असल्यामुळे केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी शिंगाडे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. यातील घटक केस मजबूत करतात.
  • शिंगाड्यात भरपूर कॅल्शियम असते. अशा परिस्थितीत जर आपण त्याचे नियमित सेवन केले तर त्याचा थेट परिणाम आपल्या हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीवर होतो.
  • आयोडीन घशाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते आणि थायरॉईडच्या बाबतीत त्याचा घशावर सर्वाधिक परिणाम होतो. अशात भरपूर शिंगाडे खावे.
  • गॅस आणि अपचनापासून आराम मिळतो पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी शिंगाड्याचं सेवन करणेदेखील खूप फायदेशीर आहे. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो
  • तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला शिंगाडं उपयुक्त ठरू शकतं. याचं सेवन केल्यानं तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होईल.
  • मूळव्याधीचा त्रास असेल तर, शिंगाडे खावेत. शिंगाडे थंड असतात. त्यामुळे मूळव्याधीत फायदा होतो. शिंगाडे खाल्ल्यामुळे पायाच्या तळव्यांच्या भेगा भरून येतात.
  • शिंगाड्यामध्ये फायबर असतं, त्यामुळे हार्ट अटॅक आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. यशिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. कावीळ झाली असेल तर, कच्चे शिंगाडे खावेत. त्यामुळे कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते

शिंगाडे खाताना घ्या काळजी

शिंगाडे जास्त प्रमाणात खाऊ नयेत आणि शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे कफदोष वाढण्याची शक्यता असते.


संपादन : निकिता शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.