After the murder, the assailant kept the status and said, Aadat nahi bolkar dikhane ki fitrati hai karke dikhane ki
Marathi October 03, 2024 11:24 PM


पूर्ववैमनस्यातून कट रचून एका टोळक्याने मंगळवारी पहाटे सफाई कर्मचार्‍याचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१) सहा वाजेदरम्यान शरणपूररोडवरील पंडीत कॉलनीत घडली. विशेष म्हणजे, हत्येनंतर हल्लेखोर सराईत गुन्हेगाराने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो ठेवत म्हटले की, आदत नही बोलकर दिखाने की फितरती है करके दिखाने की. त्याचा हा स्टेट्स सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Nashik : After the murder, the assailant kept the status and said, Aadat nahi bolkar dikhane ki fitrati hai karke dikhane ki)

हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या घटनेमुळे पंडीत कॉलनीसह घारपुरे घाट परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता.

– Advertisement –

आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे (वय २१, रा. घारपुरे घाट) असे मृत तरुणाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार अथर्व अजय दाते (वय २०, रा. अशोकस्तंभ, नाशिक), अभय विजय तरे (१९) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश हा नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. १) पहाटे सहा वाजेच्या सुमारास पंडीत कॉलनी येथून व्ही. एन. नाईक महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील मेडिकलबाहेर स्वच्छता करीत होता. त्यावेळी चार-पाच जणांचे टोळके हातात कोयते घेऊन आले. काही समजण्याच्या आत संशयितांनी आकाशवर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पळत असताना आकाशच्या पायात कुंडी अकडल्याने तो खाली पडला. आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड, गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. श्वान पथकातील ‘गूगल’ श्वान व अंमलदार गणेश कोंडे दाखल झाले.

– Advertisement –

‘गूगल’ने संशयितांच्या दिशेने धाव घेतल्यावर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. आकाशला उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय व पुन्हा दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी 4.30 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धनवटे याच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयित एका विधिसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेतले. पोलीस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.