BAN vs SCO : बांगलादेशचा पहिल्याच विजयासह धमाका, टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा
GH News October 04, 2024 01:16 AM

वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट टीमने विजयी सलामी दिली. बांगलादेशने स्कॉटलँडवर मात करत विजयी सुरुवात केली. बांगलादेशने 16 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशसाठी हा विजय फार खास असा ठरला आहे, त्याचं कारणही तसंच आहे. बांगलादेशने तब्बल 1 दशकानंतर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्कॉटलँडची पराभवाने सुरुवात झाली. स्कॉटलँडचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता. मात्र स्कॉटलँड विजयापासून 16 धावांनी दूर राहिली.

बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड यांच्यातील हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्कॉटलँडच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 119 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे स्कॉटलँडला विजयासाठी बॉल टु बॉल 1 रनची गरज होती. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजांनी या आव्हानाचा शानदार बचाव केला. बांगलादेशने याआधी टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2014 साली अखेरचा विजय मिळवला होता. बांगलादेशचा हा टी 20 वर्ल्ड कपमधील एकूण तिसरा विजय ठरला आहे.

बांगलादेशने याआधीचे टी 20 वर्ल्ड कपमधील दोन्ही सामने हे घरच्या मैदानात जिंकले आहेत. बांगलादेशमध्ये 2014 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बांगलादेशने श्रीलंका आणि आयर्लंड या दोन्ही संघांचा पराभव केला होता. त्यानंतर आता अखेर बांगलादेशची 10 वर्षांनी विजयाची प्रतिक्षा संपली आहे.

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

स्कॉटलँड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), आयल्सा लिस्टर, प्रियानाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रेचेल स्लेटर, अबताहा मकसूद आणि ऑलिव्हिया बेल.

बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुल्ताना (कर्णधार आणि विकेटकीपर), मुर्शिदा खातून, शाठी राणी, शोभना मोस्तारी, ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर आणि मारुफा अख्तर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.