पूजन करून महिलांनी दाखविला नैवेद्य
esakal October 04, 2024 05:45 AM

पिरंगुट, ता. ३ : पिरंगुट (ता.मुळशी) येथील परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना सकाळी अंघोळ घालण्यात आली. दुपारी सजविण्यात आले. त्यानंतर महिलांनी बैलांचे पूजन करून नैवेद्य खाऊ घातला आणि ग्रामदैवतांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले. पिरंगुट, लवळे आदी गावांत ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या दणदणाटात वाजतगाजत सामुदायिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. पिरंगुट येथील पवळे आळीत बैलांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

03715

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.