अक्षय शिंदेशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या दोन पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज, एका अधिकाऱ्या
Marathi October 04, 2024 06:24 AM

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण : अक्षय शिंदेशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या दोन पोलिसांना उपचारांसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज (दि.3) दोन पोलिसांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आलाय. पोलीस अभिजित मोरे आणि संजय शिंदे असे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. मात्र, अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी निलेश मोरे अजूनही रुग्णालयात  उपचार घेत आहेत.

अक्षय शिंदेचे एन्काउंटर पण शाळेचे संस्थाचालक पोलिसांच्या ताब्यात

बदलापूर मधील एका नामांकित शाळेमधील दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्षय शिंदेसह शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका गुन्ह्यामध्ये तुषार आपटे,उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला असून दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. कल्याण न्यायालयात शुक्रवारी दोन्ही आरोपींना हजर केले जाणार आहे.

आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार

उल्हासनगर क्राईम ब्रँचने दोन ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता शाळेच्या संस्थाचालकांना ताब्यात घेतले होते. कर्जतवरून तुषार आपटे उदय कोतवाल यांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी या दोघा आरोपींना तातडीने अटक केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.