Navratri 2024 Travel: जिथे सुयोग्य जोडीदाराचा मिळतो आशीर्वाद, मनोकामना होतात पूर्ण, देवी ब्रह्मचारिणीचे अनोखे मंदिर, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भेट द्या.. 
एबीपी माझा वेब टीम October 04, 2024 01:13 PM

Navratri 2024 Travel : गुरूवार पासून ठिकठिकाणी देवीचं आगमन अगदी जल्लोषात झाले आहे. 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीचे भक्त दररोज देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी ही दोन शब्दांपासून बनलेली आहे. यामध्ये ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण. म्हणजेच जो तपश्चर्या करतो. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मातेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. जिथे सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी देवीकडे मनोकामना केली जाते. जाणून घ्या या खास मंदिराबाबत..


तप, त्याग, संयम, पुण्य वाढेल..

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या रूपाची पूजा केल्याने तप, त्याग, संयम, पुण्य इत्यादी वाढतात, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी भाविक ठिकठिकाणी मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतात. ब्रह्मचारिणी आईला समर्पित सर्वात ऐतिहासिक मंदिर वाराणसी येथे आहे. या रूपात आईचे आगमन हे भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी होते. ब्रह्मचारिणी मातेने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. काशी येथे हे देवीचे मंदिर आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे. येथे लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. ब्रह्मचारिणी दुर्गा मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. जर तुम्ही येथे जात असाल तर वेळ लक्षात ठेवा, कारण हे मंदिर दुपारी बंद होते.

स्थळ- काशीमध्ये गंगेच्या तीरावर बालाजी घाटावर देवी ब्रह्मचारिणी मंदिर आहे.
पंचगंगा घाट, घासी टोला, वाराणसी
वेळ- सकाळी 6:30 ते दुपारी 1, तर सायंकाळी 5-10 वा.

 

ऐतिहासिक, चमत्कारिक मंदिर 

बिहारीच्या जंगलात वसलेल्या बागोई मातेच्या मंदिरात ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. रस्ता कच्चा असल्यामुळे तुम्हाला या मंदिरापर्यंत जाण्यात काही अडचण येऊ शकते. पण हे मंदिर ऐतिहासिक आणि चमत्कारिक मानले जाते. हे मंदिर देवास जिल्ह्यातील जंगलात आहे. येथे लोक नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिरात साखर मिठाई आणि पंचामृत अर्पण करतात.

ठिकाण- अत्रलिया, भाऊ खेडा, मध्य प्रदेश


नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जर तुम्हाला लखनऊमध्ये मातेच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुम्ही देवी पुर्वीदेवी बागंबरी मंदिरात जाऊ शकता. बाघंबरी मंदिरात माँ पुर्वी देवीची माँ ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजा केली जाते. दरवर्षी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांग लागली आहे. नवरात्रीत ९ दिवस हे मंदिर सुंदर दिवे आणि फुलांनी सजवले जाते. जर तुम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलात तर तुम्ही बदाम, काजू आणि मखणा देऊ शकता. हे देवी मातेला प्रिय मानले जाते हे लखनौच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

ठिकाण- ठाकूरगंज, चौक, लखनौ, उत्तर प्रदेश

 

>>>

Navratri 2024 Travel: संकटांपासून मुक्ती देणारं देवीचं अनोखं 'संकट मंदिर! काय आहे देवीची महती? भाविकांची श्रद्धा काय?

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.