Rice Storage Tips : या उपायांनी वर्षभरासाठी साठवा तांदूळ, लागणार नाही किड
Marathi October 04, 2024 03:24 PM

जेवणाच्या ताटात तांदूळ म्हणजेच भात अवश्य असतो. त्यामुळे रोजच्या जेवणात लागणारा तांदूळ निदान महिन्याभरासाठी तरी साठवण्यात येतो. पण, अनेकदा साठवलेल्या गहू, तांदळाला किड लागते. यामागे तांदूळ व्यवस्थित पद्धतीने स्टोअर न करणे, वातावरणातील बदल अशी कारणे असू शकतात. किड लागल्यामुळे तांदूळ लवकर खराब होतो. त्यामुळेच तांदूळ वर्षभर साठवून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आम्ही आज सांगत आहोत, ज्या उपायांमुळे तांदळातील किड, अळ्या सहजपणे काढता येईल आणि लागणार नाही.

धान्य ठेवा फ्रिजमध्ये –

तांदळाला किड लागू नये यासाठी तुम्ही 4 ते 5 दिवस तांदूळ किंवा गहू फ्रिजमध्ये ठेवू शकता, या उपायाने गहू, तांदळाला किड लागत नाही. सर्वात म्हणजे धान्य फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याच्या गुणधर्मांवर परिणाम होत नाही. त्यामुळे धान्याला किडे, अळ्यांपासून दूर ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय मानला जातो.

– जाहिरात –

कडूलिंबाची पाने –

अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असे कडुलिंबाचे पानं असते. खरं तर, कडूलिंबाच्या सुगंधामुळे किडे, अळ्या दूर राहतात. त्यामुळे वर्षानुवर्षापासून हा उपाय गहू, तांदूळातील किडे काढण्यासाठी वापरला जातो. हा उपाय करण्यासाठी तांदळाच्या डब्यात 12 ते 15 कडूलिंबाची पाने ठेवा. तांदळाला आरामात वर्षभर किडे लागणार नाहीत.

कार्ड बॉक्स –

काडेपेटीतील काड्यांमध्ये असणारे सल्फर किड्यांसाठी विषारी असते. त्यामुळे तुम्ही काडेपेटी कापडात गुडांळून ठेवू शकता.

– जाहिरात –

तांदूळ वाळवणे –

तांदळाला किड न लागण्यासाठी तुम्ही उन्हात ठेवू शकता. तसेच जर गहू, तांदळाला किड लागले असतील तर तांदूळ, गहू उन्हात पसरवा. असे केल्याने तादंळातील किडे, अळ्या निघून जातील.

तमालपत्र –

तांदळाता किड लागू नये म्हणून तुम्ही तांदळात तमालपत्र ठेवू शकता. जेवणाची चव वाढवणारे तमालपत्र धान्यांपासून किडे आणि अळ्यांना दूर ठेवतात. त्यामुळे तुम्ही तांदळाच्या डब्यात तमालपत्र ठेवू शकता. या उपायाने तांदळला किड लागता तांदूळ वर्षभरासाठी उत्तमरित्या स्टोअर होऊ शकते.

लसणाच्या पाकळ्या –

लसणाच्या पाकळ्यांमुळे तांदळाला किडे लागत नाही. त्यामुळे न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि लसूण सुकल्यावर बदलत राहा.

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.