रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अखेर जाहीर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव
Marathi October 04, 2024 01:24 PM

महाराष्ट्राचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर बॅडमिंटन प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जीवनगौरव


महाराष्ट्रातील ‘ऑस्कर’ म्हणून संबोधले जाणाऱया मानाच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’चा 19 फेब्रुवारीचा (शिवजयंती) मुहूर्त नेहमीप्रमाणे यंदाही हुकला असला तरी मिंधे सरकारने जाता जाता का होईना पण 2022-23 सालासाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर केले. माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याचबरोबर बीडचा ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आणि वाद हे समीकरण महाराष्ट्रासाठी नवे नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळीही राज्य क्रीडा समिती सदस्य आणि क्रीडा अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव, सत्तेच्या सारीपाटाचा फटका, खेळाडूंची न्यायालयात धाव अशा अनेक कारणांमुळे यंदाची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड प्रक्रिया गाजली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तारीख पे तारीख झाल्यानंतर अखेर 2022-23 चे राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले.

दिनेश लाड, अनिल घाटे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक

जिम्नॅस्टिक्समधील ठाण्याचे पवन भोईर, कबड्डीतील मुंबई शहरचे अनिल घाटे, अॅक्वेटीक्समध्ये दिव्यांग खेळाचे मुंबई उपनगरमधील मार्गदर्शक राजाराम घाग व रोहित शर्माचे प्रशिक्षक असलेले दिनेश लाड यांना उत्पृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठsच्या जिजामाता राज्य पुरस्कारासाठी धनुर्विद्येतील नगरच्या शुभांगी रोकडे व पॅराशूटिंगमधील रायगडच्या सुमा शिरूर यांनी निवड झाली आहे.

वादग्रस्त ठरलेल्या खेळाडूंनाही मिळाला न्याय

राज्य शासनाने 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांचे राज्य क्रीडा पुरस्कार जानेवारीत जाहीर केले होते, मात्र काही खेळाडूंनी या निवड प्रक्रियेवर अक्षेप घेत न्यायालयाचे दार ठोठावल्याने या पुरस्कार सोहळय़ाचा शिवजयंतीचा हुकला. कल्याणी जोशी, विराज लांडगे, गणेश नवले, विराज परदेशी, कोमल किरवे, राजश्री गुगळे व मिताली वाणी या खेळाडूंनी अन्यायाविरुद्ध न्यायालयाचे दार ठोठावले होते. या वादग्रस्त खेळाडूंनाही न्याय मिळाल्यानंतर अखेर हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा तिढा सुटलाय.

हा माझा नव्हे, माझ्या खेळाचा गौरव

गेली पाचपेक्षा अधिक दशके मी खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटक म्हणून जी माझ्या बॅडमिंटन खेळाची सेवा करतोय. आज त्या सेवेचा गौरव राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन केला आहे. हा माझा नव्हे, तर माझ्या खेळाचा, आमच्या खेळावर प्रेम करणाऱया असंख्य चाहत्यांचा गौरव आहे, अशी भावना व्यक्त केली पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ बॅडमिंटनपटू आणि संघटक प्रदीप गंधे यांनी.

चार वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळातील योगदानाबद्दल पेंद्र सरकारने गंधे यांना प्रतिष्ठsच्या ‘ध्यानचंद पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. गंधे यांना 1978 साली बॅडमिंटनचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला होता. आज राज्य सरकारने जीवनगौरव पुरस्कार जाहीर केल्यानंतरही ते भारावले. आज माझे बाबा श्रीपृष्ण गंधे असते तर माझा हा गौरव पाहून भारावले असते, अशी भावनिक प्रतिक्रिया गंधे यांनी व्यक्त केली. कबड्डीपटू श्रीपृष्ण गंधे यांनाही संघटक म्हणून हा पुरस्कार लाभला आहे.

महाराष्ट्र मागे असल्याची खंत

क्रिकेट, हॉकीप्रमाणे बॅडमिंटनचाही क्रीडा जगतात दरारा वाढतोय. आज हिंदुस्थानातून मोठय़ा प्रमाणात बॅडमिंटनपटू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करत आहेत, मात्र यात महाराष्ट्र मागे असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) जसे अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थान उभारले आहेत तसेच महाराष्ट्रातही उभारले जावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

2022-23 ची पुरस्कारार्थींची यादी
-शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव : प्रदीप गंधे – बॅडमिंटन (मुंबई शहर).
-उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक ः पवन भोईर – जिम्नॅस्टिक्स (ठाणे), अनिल घाटे – कबड्डी (मुंबई शहर), राजाराम घाग -अॅक्वेटीक्स, दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक (मुंबई उपनगर), दिनेश लाड – क्रिकेट (मुंबई उपनगर).
-जिजामाता पुरस्कार ः शुभांगी रोकडे – धनुर्विद्या (नगर), सुमा शिरूर – पॅराशूटिंग (रायगड).
-शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ः अविनाश साबळे – अॅथलेटिक्स (बीड), दीप रामभीया – बॅडमिंटन (मुंबई शहर), आदित्य मेहता – बिलियर्ड्स अॅण्ड स्नूकर (मुंबई शहर), नीलम घोडके – पॅरम (मुंबई उपनगर), संदीप दिवे – कॅरम (मुंबई शहर), अभिजित त्रिपणकर – पॅरम (जळगाव), आदित्य मित्तल – बुद्धिबळ (मुंबई उपनगर), शशिकला आगाशे – सायकलिंग (भंडारा), प्रतीक पाटील – सायकलिंग (कोल्हापूर), कशीश भराड – तलवारबाजी (छत्रपती संभाजीनगर), गिरीश जकाते – तलवारबाजी (सांगली), पुणाल कोठेकर – जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिक्स (मुंबई उपनगर), जान्हवी जाधव – मल्लखांब (मुंबई उपनगर), रूपाली गंगावणे – मल्लखांब (मुंबई उपनगर), अक्षय तरळ – मल्लखांब (मुंबई उपनगर), ऋचिता विनेरकर – नेमबाजी (पालघर), रुद्रांक्ष पाटील – नेमबाजी (ठाणे), शाहू माने – नेमबाजी (कोल्हापूर), याश्वी शाह – स्केटिंग (मुंबई उपनगर), सुहृद सुर्वे – स्केटिंग (पुणे), श्रेयस वैद्य – वॉटरपोलो (रायगड), श्रुती कडव – आटय़ापाटय़ा (नागपूर), सर्वेश मेनन – आटय़ापाटय़ा (अमरावती), सिद्धांत मोरे – शरीरसौष्ठव (छत्रपती संभाजीनगर), पूनम पैथवास – बॉक्सिंग, रेनॉल्ड जोसेफ – बॉक्सिंग (पुणे), अक्षता ढेकळे – हॉकी (सातारा), अपूर्वा पाटील – ज्युदो (ठाणे), अंकिता जगताप – कबड्डी (पुणे), पंकज मोहिते – कबड्डी (मुंबई शहर), प्रियंका इंगळे – खो-खो (पुणे), सुयश गरगटे – खो-खो (पुणे), अक्षया शेडगे – पॉवरलिफ्टिंग (पुणे), धमेंद्रपुमार यादव – पॉवरलिफ्टिंग (ठाणे), कोमल वाकळे – वेटलिफ्टिंग (नगर), नंदिनी साळोखे – पुस्ती (कोल्हापूर), कल्याणी जोशी – वुशू (पुणे), विष्णू सर्वानन – याटिंग (मुंबई शहर), वैष्णवी पाटील – रग्बी (कोल्हापूर), श्रीधर निगडे – रग्बी (कोल्हापूर), श्रेया नानकर – क्लायबिंग (पुणे), साहिल खान – क्लायबिंग (पुणे), नेहा देशमुख – सॉफ्टबॉल (जळगाव), जयेश मोरे – सॉफ्टबॉल (जळगाव), पूर्वा किनरे – योगासन (रत्नागिरी), नितिन पवळे – योगासन (पुणे).

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार ः जयंत दुबळे – जल (नागपूर), कस्तुरी सावेकर – जमीन (कोल्हापूर).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग) ः अफ्रीद अत्तार – जलतरण (कोल्हापूर), अन्नपूर्णा कांबळे – अॅथलेटिक्स (कोल्हापूर), नीलेश गायकवाड – बॅडमिंटन (छत्रपती संभाजीनगर), अनिता चव्हाण – व्हीलचेअर तलवारबाजी (छत्रपती संभाजीनगर), लताबाई उमरेकर – बॅडमिंटन (नांदेड), प्रियेषा देशमुख – नेमबाजी, नताशा जोशी – नेमबाजी (मुंबई उपनगर), प्रांजली धुमाळ – नेमबाजी (सातारा).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (2019-20) ः विराज लांडगे – कबड्डी (पुणे), गणेश नवले – आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स (पुणे), विराज परदेशी – मॉडर्न पेंटॅथलॉन (पुणे).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०२०-२१): कोमल किरवे – वॉटरपोलो (रायगड). मिताली वाणी – वुशू (पुणे).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (2021-22) ः राजश्री गुगळे – वॉटरपोलो (पुणे).

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.