वृद्धाश्रमातील महिलांसोबत आनंददायी संध्याकाळ
esakal October 06, 2024 03:45 AM

काही सुखद---लोगो


-rat४p३२.jpg-
P२४N१६३३७
पावस ः पावस येथील आनंदी अनुसया महिला वृद्धाश्रमामध्ये मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजने ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंद साजरा केला.
-----------

वृद्धाश्रमात आनंददायी संध्याकाळ

‘फिनोलेक्स’ची बांधिलकी ; भजनाचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजने आपल्या सामाजिक बांधिलकीतून वृद्धाश्रमांसाठी किराणा माल, आरोग्य तपासणी, त्यांना लागणारी फिजिओथेरपी, त्यासाठीचे उपकरण पुरवून सकारात्मक कार्य चालू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त रत्नागिरीतील पावस येथील आनंदी अनुसया वृद्धाश्रमात १५ ज्येष्ठ नागरिकांसोबत व सहकाऱ्यांबरोबर आनंददायी संध्याकाळ घालवण्यात आली.
संध्याकाळची सुरवात एका मनोरंजक भजनाने करण्यात आली. त्यामुळे सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसला. हा सोहळा साजरा करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने ज्येष्ठ नागरिक आनंदित झाले. सर्वांनी भजनाच्या कार्यक्रमाचा आणि नाश्त्याचा मनापासून आस्वाद घेतल्याने उत्साहाचे वातावरण होते. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रतिनिधी या अद्भुत उत्सवाचा एक भाग होते.
मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या सामाजिक बांधिलकीतून गेली काही वर्षे रत्नागिरीमधील स्वगृही वृद्धाश्रम, अरूणाश्रम लांजा, आनंदघर यांसारख्या वृद्धाश्रमांना मासिक किराणा सामान, सोलरलाइट सिस्टिम, फिजिओथेरपी सेशन, ऑर्थोटिक उपकरणांसह सक्रियपणे मदत करत आहेत. या कार्यक्रमाचे ज्येष्ठ नागरिक व व्यवस्थापनाने मनापासून कौतुक केले.
--------

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.