Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - जान्हवी किल्लेकर ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर; निवडली पैशांची बॅग
esakal October 06, 2024 11:45 PM
Jahnavi Killekar Exit From Bigg Boss Marathi 5: जान्हवी किल्लेकर ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर; निवडली पैशांची बॅग

जान्हवी थेट ग्रँड फिनालेमध्ये येऊन पोहोचली. मात्र ग्रँड फिनालेमध्ये आता जान्हवीने पैशांची बॅग घेऊन घराबाहेर जाणं पसंत केलं. नऊ लाखांची रक्कम घेऊन जान्हवी घराबाहेर झाली आहे.

bigg boss marathi 5 live: 'बिग बॉस ग्रँड फिनालेमध्ये नवा ट्विस्ट; स्पर्धकांना ९ लाखांची ऑफर

घरातील सहा स्पर्धकांना ९ लाखांची ऑफर देण्यात आली आहे.

Salman Khan Praises Riteish Live : सलमान खानने केलं रितेश देशमुखचं कौतुक

अभिनेता सलमान खान याने रितेश देशमुख याच्या होस्टिंगचं कौतुक केलं आहे. रितेश भाऊ तू या कार्यक्रमात खूप गंमत आणली, असं म्हणत त्याने रितेशचं कौतुक केलं.

Riteish Deshmukh In Bigg Boss Marathi Live: रितेशने सांगितलं शेवटचे दोन आठवडे नसण्याचं कारण

रितेशने ग्रँड प्रीमिअरला हजेरी तर लावली सोबतच गेले दोन आठवडे नसण्याचं कारण सांगितलं आहे. वर्षभरापूर्वी केलेल्या एका कमिटमेंटसाठी त्याला दोन आठवडे शूटिंगवर जावं लागलं. एका क्रूजवर ही शूटिंग असल्याने ती टाळता येणार नव्हती. त्यामुळे आपण इथे उपस्थित राहू शकल्याचं त्याने सांगितलं.

BB Marathi Grand Finale Live: 'बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेला सुरुवात; रितेश भाऊंचा कल्ला सुरू, घराबाहेर झालेले स्पर्धकही हजर

'बिग बॉस मराठी ५' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. रितेश देशमुख याने ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात केली आहे.

Bgg Boss Marathi 5live: 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रँड फिनाले पण रितेश भाऊ दिसणार का?

गेले दोन आठवडे भाऊचा धक्का झाला नाही कारण रितेश देशमुख शूटिंगला अनुपस्थित होता. आता आज ग्रँड फिनालेला रितेश भाऊ दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

Bigg Boss Marathi 5 Top 3 Live: 'हे' स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

'बिग बॉस मराठी ५' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ग्रँड फिनालेची शूटिंग सुरू झाली आहे. त्यामुळे फॅन पेजेस चाहत्यांपर्यंत सगळ्यात आधी माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत. मात्र अशातच एक ट्वीट व्हायरल होतंय. ज्यात 'बिग बॉस मराठी ५'चे टॉप ३ स्पर्धक जाहीर करण्यात आले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर आहे निक्की तांबोळी. दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिजीत सावंत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सुरज चव्हाण. मात्र हे ट्वीट कितपत खरं आहे यावर नेटकरी शंका व्यक्त करत आहे.

bigg boss marathi 5 top 3 'बिग बॉस मराठीच्या शूटिंगला सुरुवात; कोण कितव्या स्थानावर?

'बिग बॉस मराठी ५' च्या शूटिंगला दुपारी ३ वाजताच सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण ६ वाजता जिओ अँपवर पाहता येईल. मात्र शुटिंग सुरू झाल्याने फॅन पेजेस सगळ्यात आधी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यानुसार निक्कीने टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं असल्याची माहिती आहे.

कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. निक्की टॉप ३ मध्ये असल्याचं बोललं जातंय. तर सुरज तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं बिग बॉसच्या फॅन पेजेसकडून सांगण्यात येतंय.

BB Marathi Grand Finale Live : ग्रँड फिनालेमध्ये दिसणार वैभव आणि इरिनाच्या डान्सचा जलवा

'बिग बॉस मराठी ५' च्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना घराबाहेर झालेल्या वैभव आणि इरिना यांचा डान्स पाहायला मिळणार आहे.

BB Marathi 5 Live Voting Trends : वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्कीने सूरजला टाकलं मागे

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या वोटिंगबद्दल नवीन माहिती समोर येते आहे. 'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या वोटिंग ट्रेंडनुसार निक्की तांबोळी हिने सूरजलादेखील मागे टाकलं आहे. वोटिंगच्या बाबतीत निक्की पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सुरज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत आहे.

ग्रँड फिनालेपूर्वी बदलले वोटिंग ट्रेंड, निक्कीने मारली बाजी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या ग्रँड फिनालेला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी वोटिंग ट्रेंडमध्ये बदल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंडनुसार बिग बॉस मराठी सीजन 5 शेवटच्या दिवशी धक्कादायक वोटिंग झालं आहे. सूरज चव्हाणने त्याचा नंबर 1 राखून ठेवला आहे पण नंबर 2 वर आला आहे अभिजीत सावंत ज्याला काल तिसरं स्थान होतं तर पाचव्या स्थानावर असलेली निक्की आता तिसऱ्या स्थानावर आलीये आणि अंकिताला चौथ, धनंजय ला पाचवं आणि जान्हवीला सहावं स्थान मिळालं आहे.

संध्याकाळी रंगणार ग्रँड फिनालेचा सोहळा

आज ६ ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यात प्रत्येक स्पर्धकाचा हटके डान्स दाखवण्यात येणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.