साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? कोणाचे टोचले कान?
GH News October 07, 2024 04:13 PM

पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. ‘राज्यातील साहित्यिक, कवी पाहत आलो, तो मराठी बाणा म्हणतो तो प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा, योग्यवेळी जे ठणकावून सांगणे, राजकारण्यांना, बिघडलेल्या सांस्कृतिक आणि इतर गोष्टींना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत होती, ती आज कमी दिसतेय असं वाटतं’, असे राज ठाकरे यांनी म्हणत राज ठाकरे साहित्यिकांचे कान टोचल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, महाराष्ट्राचा झालेला खेळ, राज्याची सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकता, असे राज ठाकरे म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.