BIG BOSS Marathi season 5: स्टार स्पर्धकांना मागे सोडत सुरज झाला बिग बॉसचा 5 चा विजेता
Idiva October 07, 2024 09:45 PM

बिग बॉस या वादग्रस्त रिॲलिटी शोची बरीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. हिंदीशिवाय बिग बॉस  हा शो भारतात अनेक भाषांमध्ये होतो.बिग बॉस 18 हिंदी सुरू झाला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांनी प्रवेश केला होता. एकीकडे बिग बॉस 18 ची चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीही चर्चेत आले आहे. खरंतर, रविवारी बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले पार पडला .बिग बॉस मराठी सीझन 5 यावर्षी जोरदार चर्चा झाली आहे. बिग बॉस 5 ड्रामाची काहीच कमी नव्हती, शो बद्दल अनेक controversy  समोर आल्या होत्या.  बिग बॉस मराठी सीजन 5 या शो  मध्ये बिग बॉस 14 मध्ये आलेली निक्की तांबोळी आणि गायक अभिजीत सावंत यासारखे स्टार्स स्पर्धक सहभागी झाले होते. पण या स्टार स्पर्धकांना काट्याची टक्कर देत सुरज चव्हाण बिग बॉस सीजन 5  चा विजेता ठरला आहे.

सुरज चव्हाण विजेता

instagram

सोशल मीडियावर फक्त सूरज चव्हाण यांचीच चर्चा होत आहे. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या सर्वात प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे. विजेत्याच्या ट्रॉफीसह, सूरजला 14.6 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आणि 10 लाख रुपयांचे ज्वेलरी व्हाउचर आणि एक बाइक मिळाली. यासोबतच दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही सूरज चव्हाण यांना घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली. सुरजने दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शोमध्ये जेव्हा तो डिझायनर कपड्यांमध्ये दिसला तेव्हा चाहत्यांच्या मनात प्रश्न पडला होता की सूरजने डिझायनर कपडे कसे घातले आहेत. वास्तविक, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सुमैया पठाण त्यांना डिझायनर कपडे पाठवत होत्या. सहसा, सेलिब्रिटींना कपडे परिधान केल्यानंतर डिझायनरला परत करावे लागतात, परंतु सुमैया पठाणने सूरजला कपडे दिले. 

 विजेत्याला लाखांचे बक्षीस मिळाले

instagram

हेही वाचा :Sharad Kelkar Birthday: अभिनयासोबत डबिंग क्षेत्रातही बाहुबली आहे शरद केळकर

सूरज चव्हाण हा बिग बॉसचा सर्वात मजबूत स्पर्धक होता. त्यांचे खरे व्यक्तिमत्व लोकांना खूप आवडले. लोकांशी असलेले त्यांचे नाते आणि खेळावरील निष्ठा यामुळे त्याने लोकांच्या हृदयात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले होते. सूरजचे सोशल मीडियावर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सूरज चव्हाणला ट्रॉफीसह मोठी रक्कम मिळाली आहे. त्याला 14.6 लाख रुपये रोख बक्षीस मिळाले आहे. तसेच 10 लाख रुपयांचे दागिने व एक दुचाकी वाहन मिळाले आहे.

हे स्पर्धक टॉप 5 मध्ये राहिले

अभिजीत सावंत हा पहिला उपविजेता ठरला. तर निक्की तांबोळी, धनंजय पवार आणि अंकिता वालावलकर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले. तर जान्हवी पैशांची पिशवी घेऊन बाहेर आली. त्याने 9 लाख रुपये घेतले आणि ती फिनालेपूर्वी शोमधून बाहेर पडली. 

instagram

सूत्रसंचालक रितेश देशमुखची ही हवा

 दरवर्षी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत होते, मात्र यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने घेतली होती.ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने संदेशाद्वारे रितेशच्या होस्टिंगचे कौतुक केले. तसेच, जिगरा कलाकार आलिया भट्ट, वेदांग रैना आणि वासन बाला देखील त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ग्रँड फिनालेमध्ये आले होते. तसेच आता सलमान खानचा हिंदी बिग बॉस ला सुरुवात झाली आहे हिंदी बिग बॉस कडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.