Marathi News Live Updates : पिंपरीत चिखली मोशी रोडवर ३ गोडाऊनला भीषण आग
Saam TV October 07, 2024 09:45 PM
Pimpri Fire : पिंपरीत चिखली मोशी रोडवर ३ गोडाऊनला भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मोशी रोडवर तीन गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

आज दुपारी अचानक चिखली मोशी रोडवरील इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या साठा असलेल्या गोडाऊनला आग लागली आहे. या आगीत तीन गोडाऊन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीच्या बद्दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

MVA Seat Sharing Meeting : मविआची जागा वाटपाची बैठक सुरू

गेल्या एक तासापासून मविआची जागा वाटपाची बैठक सुरू

बैठकीत प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांवर चर्चा सुरू

सलग तीन दिवस होणार आहेत बैठका

बैठकीसाठी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय राऊत, अनिल देसाई, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड उपस्थित

सुषमा अंधारेपुणे पोलिस प्रशासनामध्ये आनंदी आनंद आहे. आरोपी सापडत नाहीत, मी लवकरच अक्षय शिंदे एन्काऊंटर बाबत मोठा खुलासा एक दोन दिवसात करणार आहे. आपटे याला अटक करण्याची वेळ बरोबर निवडली. आपटे सरकारच्या निगराणी खाली सुरक्षित होता, शिंदे अनेक खुलासे करणार होता, आपटेसाठी शिंदेचा खातमा करण्यात आला. अनेक खुलासे करणार आहोत. चंद्रपुरात निघाला आदिवासीचा महाआक्रोश मोर्चा

चंद्रपुरात आदिवासी समाजबांधवानी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षण अनुसूचित जमातीतून देऊ नये, अशी मागणी केली. यात सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये, या प्रमुख मागणीसह अन्य १३ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळास धनगर व धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही...

अमरावतीच्या दर्यापूरची विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे, तरी देखील काही लोक इथे अडचणी निर्माण करताहेत..एकदा आम्ही गप्प बसलो आता गप्प बसणार नाही असा थेट इशारा शिवसेना नेते दर्यापूरचे माजी आमदार अभीजीत अडसूळ यांनी महायुतीसह राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षरीत्या दिलाय...

Solapur News: सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न

सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न

सोलापूर विमानतळहुन देवेंद्र फडणवीस मंगळवेढाकडे निघाले असता धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

धनगर समाजाला ST मधून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी ताफा अडवण्याचा प्रयत्न

धनगर समाजाचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी मजरेवाडी चौकात ताफा अडवण्याचा प्रयत्न

शेखर बांगळे यांनी या आधी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता

नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्या उपस्थित बैठक

दि बा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकीला दि बा पाटील संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

या संदर्भातील ठराव कॅबिनेटमध्ये ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Pune News: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, 250 संशयतांची पोलिसांकडून चौकशी

पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात तब्बल 250 संशयतांची पोलिसांनी केली चौकशी.

तीन तारखेला पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोगदेव घाटात कॉलेज तरुणीवर तिच्या मित्राचे हातपाय बांधून तिघा नराधमानी केला होता सामूहिक अत्याचार.

या प्रकरणातील तिन्ही आरोपी अध्याप पोलिसांना सापडले नसून या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 250 संशयताची चौकशी केली आहे.. परराज्यातील असलेली ही तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे

Nashik News: मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा सत्कार

मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा त्यांच्या मतदारसंघात सत्कार

नाशिकच्या दिंडोरी पेठ तालुक्यातील झिरवळ यांचा जाहीर सत्कार

मंत्रालयात आंदोलन करून पेसा भरती आणि धनगर आरक्षणाविरोधात आवाज उठवल्याबद्दल सत्कार

जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाला आदिवासी बांधव उपस्थित

Pune News: अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली

अमित ठाकरे यांनी केली पदाधिकाऱ्यांशी सोलापुरातील मतदारसंघाबाबत चर्चा

Pune News: पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

पुणे शहर आणि जिल्ह्याचे विभाग अध्यक्ष यांच्या शी राज ठाकरे चर्चा करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक

पुणे शहरातील अनेक जणं मनसेचे मुख्य नेत्यांपैकी आहेत

अनिल शिदोरे, बाबू वागास्कर बैठकीला उपस्थित

आज पुणे शहरातील काही जागांवर अंतिम चर्चा होणार

Nagpur News: देवेंद्र फडणवीस यांच्या त्याफ्यातील वाहनाला अपघात

देवेंद्र फडणवीस यांच्या त्याफ्यातील वाहनाला अपघात

नागपूर ग्रामीण पोलिस अधिक्षक यांच्या स्ट्रायकिंग फोर्सची गाडी पलटली

⁠उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गेल्यानंतर ही पायलट गाडी जात असताना झाला अपघात

अपघातात कोणीही जखमी नाही

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना आमनेसामने

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात असतानाच आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यादेखील या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांचे पती एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. यामुळे महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

राज ठाकरेमाझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी करणार आहे. कारण साहित्यिक यांच्यासमोर आम्ही काय बोलणार? त्यांच्यासमोर बोलायचं नाही ऐकायचं असतं. प्रत्येक लेखक, कवी यांच्या मनात मराठी बाणा असायचा, तो हा बाणा राजकीय नेत्यांना ठासून सांगणं आता दिसत नाही. सध्या राजकारणात अनेक नेते आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीतून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. मी माझ्याबद्दल होत असलेल्या गोष्टी सोशल मीडियावर कधी पाहायला जात नाही. मला वाटतं साहित्यिकांनी त्यांनी केलेल्या ट्रोलिंगचा विचार करू नये. महाराष्ट्रातील राजकारणातील भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. साहित्य संमेलन येत राहतील पण भाषा सुधरावण्याचे सामाजिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. हरियाणा व जम्मू-काश्मीरमध्ये बहुमताने सरकारी येईल - कुणाला चौधरी

काँग्रेस प्रदेश कमिटीचे सहप्रभारी कुणाल चौधरी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.नांदेड येथे काँग्रेसच्या पक्षाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल. महायुतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला असं म्हणत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना दिलासा, जामीन मंजूर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण महाविकास आघाडीने शब्द पाळला नाहितर राज्यातील चाळीस जगा लढवू- मनोहर धोंडे

लोहा-कंधार मतदारसंघ सेवा जनशक्ती पक्षाला सोडला नाही तर आम्ही राज्यात चाळीस जागा लढवू असा इशारा मनोहर धोंडे यानी दिलाय. लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून महाविकास आघाडीला पाठींबा दिला होता. त्याचा फायदा देखील महाविकास आघाडीला झालाय. आम्ही महाविकास आघाडीला दहा जागा मागितल्या आहेत.. विशेष करून लोहा-कंधार मतदारसंघ सेवा जनशक्ती पक्षाला सोडण्याचा शब्द त्यावेळी देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीने शब्द पळला नाहीतर आम्ही राज्यातील चाळीस जागा लढवू असा इशारा सेवा जनशक्ती पक्षाचे संथापक संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिलाय.

मराठी भाषा समितीच्या अध्यक्ष असलेल्या आमदारांकडून मतदारसंघात वाटलेल्या पत्रात अनेक चुका

मराठी शब्दांच्या चुका असलेलं पत्रक सोशल मीडियावर व्हायरल

हडपसर चे आमदार चेतन तुपे हे राज्याच्या मराठी भाषा समिती चे अध्यक्ष आहेत

पत्रकात मात्र मराठी व्याकरणासह अनेक शब्द चुकीचे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर वाटली गेली अनेक पत्रकं

पत्रकात अनेक शब्दांची शब्दरचना सुद्धा चुकलेली

अमरावतीमध्ये अपघातात दोन जण ठार

यवतमाळच्या पुसद वाशिम मार्गावरील घाटात टॉयोटा वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा जागीचा मृत्यू झाला. पाच ते सहा जण गंभीर झाल्याची घटना घडली.

छत्रपती संभाजीनगरात थोड्याच वेळात बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा निघणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १२ धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळपासूनच छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे.

पुण्यात आज पार पडणार मनसेची पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक

पुण्यात आज पार पडणार मनसेची पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार बैठका

बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार

विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती, इच्छुक उमेदवारांची माहिती, त्या त्या मतदारसंघात इतर राजकीय पक्षांची यंत्रणा, सर्वेक्षणातील मुद्दे, पक्षाची तिथे असलेलं संघटन अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार

राज ठाकरे यांच्यासह अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिशिर सावंत, बाबू वागस्कर हे नेते सगळ्या बैठकीसाठी उपस्थितीत असणार

जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्हापुरात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे नेते राजेश क्षिरसागर यांनी दक्षिण मतदार संघात मेळावा घेऊन भाजपला आपली ताकद दाखवून दिलीय. भाजपने उत्तर मतदार संघावर दावा केल्या नंतर क्षीरसागर यांनी थेट दक्षिण मतदार संघात मेळावा घेत महाडिक कुटुंबियांना आव्हान दिलंय. हा मतदारसंघ भाजपचा असून माजी आमदार अमल महाडिक इथून इच्छुक आहेत. तर खासदार धंनजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे उत्तर मतदार संघातून इच्छुक आहेत. दोन्ही जागा भाजपने मागितल्याने क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले आहेत.शिवाय त्यांनी महाडिक आणि दक्षिण बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सतेज पाटील या दोघानाही शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवून दिलीय.

BJP News : भाजपची नेत्यांची कानउघडणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपची नेत्यांचे कानउघडणी

दक्षिण मुंबईतील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांवर व्यक्त केली नाराजी

हिंदुत्त्ववादी मुद्द्यांना बगल दिल्याने नाराजी

गिरगाव येथे झालेल्या बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली समज

इतर धर्मीयांचे लांगुलचालन करू नका

हिंदूत्ववादी मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला - सूत्रांची माहिती

Hingoli : तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मराठवाड्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आज हिंगोलीत ३४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू गाताडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावातील रहिवाशी होते. राजू यांचे मागील महिनाभरा पूर्वी पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

भाजपच्या माजी नगरसेवक सीमा साबळे शरद पवारांच्या भेटीला

पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का?

भाजपच्या माजी नगरसेवक सीमा साबळे शरद पवारांच्या भेटीला

शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक

शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल

पिंपरीत अण्णा बनसोडे अजित पवार गटाचे आमदार आहेत

मतदारसंघ राखीव असल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

Marathi News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून प्रचाराला सुरुवात Marathi News Live Updates : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी "सिंबा"ची मदत

सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरियल एनालिसिस (SIMBA) या ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यातील निवडणुका , जागावाटप आणि अजित पवार यांची नक्की भूमिका काय असेल यावर महत्वाची चर्चा होणार आहे.

Pune Crime : पुण्यातील बाणेर टेकडीवर लुटणाऱ्या गँग चा पर्दाफाश

मित्रासोबत फिरायला गेलेल्या नागालँड येथील महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना पुण्यातील बाणेर टेकडी परिसरात शनविरी घडली होती. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी २ चोरट्यांनी अटक केलीय. अजिंक्य बोबडे, निखिल डोंगरे यांच्यासह २ अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त विशेष रेल्वे गाड्या

- नागपूर येथे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे विशेष रेल्वे गाड्या

- दीक्षाभूमीवरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबई पुणे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते...

- ही गर्दी लक्षात घेऊन 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, पुणे आणि नाशिक विशेष गाड्यांची रेल्वेकडून व्यवस्था

Pune News : पुणे आणि भोपाळ मार्गावर इंडिगो कंपनीने नव्याने विमानसेवा सुरू

Pune News : पुणे आणि भोपाळ मार्गावर इंडिगो कंपनीने नव्याने विमानसेवा सुरू झाली आहे. पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

२७ ऑक्टोबर दररोज या मार्गावर उड्डाण सुरू होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार तसेच पुणे-इंदौर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर देखील इंडिगो दिवाळीच्या आधीच म्हणजे २७ ऑक्टोबर पासून आपल्या उड्डाणांची संख्या देखील वाढवणार

असे असेल उड्डाणांचे वेळापत्रक…

६ए-२५८ हे पुणे-भोपाळ विमान २७ आॅक्टोबरपासून दररोज दुपारी १ वाजता उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ६ए-२५७ हे भोपाळ-पुणे विमान दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि ४ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.