उद्योगपती रतन टाटा वैद्यकीय चाचण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Marathi October 08, 2024 01:24 AM

रतन टाटा रुग्णालयात दाखल : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत, असेही म्हटले जात होते. मात्र आता खुद्द रतन टाटा यांनीच त्यांच्या या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं रतन टाटा यांनी सांगितलं आहे.  रात्री उशिरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

विख्यात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली चाचण्या

मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांना यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली चाचण्या केल्या जात आहेत. डॉ. शाहरुख हे एक विख्यात डॉक्टर आहेत. रतन टाटा यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यामागचं कारण काय?

सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांचा रक्तदाब रात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रतन टाटा यांनी दिले स्पष्टीकरण

रतन टाटा यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. “माझ्या प्रकृतीविषीय काही अफवा पसरत आहेत. माझे वय लक्षात घेता तसेच सध्याची माझी प्रकृती पाहता माझी सध्या वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. काळजी करण्यासारखं फार काही नाही. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती पसवरू नये,” असे रतन टाट यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

रतन टाटा दर तासाला खर्च करणार 2.28 कोटी रुपये, अदानी अंबानींचं टेन्शन वाढणार, नेमका प्लॅन काय?

रतन टाटा यांचा सर्वाधिक विश्वासू व्यक्ती कोण? त्यांच्यावर 11 लाख कोटींच्या व्यवसायाची जबाबदारी

एकेकाळी रतन टाटा विकणार होते ‘ही’ कंपनी, आज ही कंपनी करतेय 2.41 लाख कोटींची उलाढाल

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.