Marathi News Live Updates : जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली
Saam TV October 08, 2024 03:45 AM
जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्हापुरात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे नेते राजेश क्षिरसागर यांनी दक्षिण मतदार संघात मेळावा घेऊन भाजपला आपली ताकद दाखवून दिलीय. भाजपने उत्तर मतदार संघावर दावा केल्या नंतर क्षीरसागर यांनी थेट दक्षिण मतदार संघात मेळावा घेत महाडिक कुटुंबियांना आव्हान दिलंय. हा मतदारसंघ भाजपचा असून माजी आमदार अमल महाडिक इथून इच्छुक आहेत. तर खासदार धंनजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे उत्तर मतदार संघातून इच्छुक आहेत. दोन्ही जागा भाजपने मागितल्याने क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले आहेत.शिवाय त्यांनी महाडिक आणि दक्षिण बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सतेज पाटील या दोघानाही शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवून दिलीय.

BJP News : भाजपची नेत्यांची कानउघडणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपची नेत्यांचे कानउघडणी

दक्षिण मुंबईतील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांवर व्यक्त केली नाराजी

हिंदुत्त्ववादी मुद्द्यांना बगल दिल्याने नाराजी

गिरगाव येथे झालेल्या बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली समज

इतर धर्मीयांचे लांगुलचालन करू नका

हिंदूत्ववादी मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा सल्ला - सूत्रांची माहिती

Hingoli : तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मराठवाड्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आज हिंगोलीत ३४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू गाताडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावातील रहिवाशी होते. राजू यांचे मागील महिनाभरा पूर्वी पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

भाजपच्या माजी नगरसेवक सीमा साबळे शरद पवारांच्या भेटीला

पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का?

भाजपच्या माजी नगरसेवक सीमा साबळे शरद पवारांच्या भेटीला

शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक

शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल

पिंपरीत अण्णा बनसोडे अजित पवार गटाचे आमदार आहेत

मतदारसंघ राखीव असल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

Marathi News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून प्रचाराला सुरुवात Marathi News Live Updates : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी "सिंबा"ची मदत

सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरियल एनालिसिस (SIMBA) या ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यातील निवडणुका , जागावाटप आणि अजित पवार यांची नक्की भूमिका काय असेल यावर महत्वाची चर्चा होणार आहे.

Pune Crime : पुण्यातील बाणेर टेकडीवर लुटणाऱ्या गँग चा पर्दाफाश

मित्रासोबत फिरायला गेलेल्या नागालँड येथील महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना पुण्यातील बाणेर टेकडी परिसरात शनविरी घडली होती. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी २ चोरट्यांनी अटक केलीय. अजिंक्य बोबडे, निखिल डोंगरे यांच्यासह २ अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त विशेष रेल्वे गाड्या

- नागपूर येथे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे विशेष रेल्वे गाड्या

- दीक्षाभूमीवरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबई पुणे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते...

- ही गर्दी लक्षात घेऊन 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, पुणे आणि नाशिक विशेष गाड्यांची रेल्वेकडून व्यवस्था

Pune News : पुणे आणि भोपाळ मार्गावर इंडिगो कंपनीने नव्याने विमानसेवा सुरू

Pune News : पुणे आणि भोपाळ मार्गावर इंडिगो कंपनीने नव्याने विमानसेवा सुरू झाली आहे. पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

२७ ऑक्टोबर दररोज या मार्गावर उड्डाण सुरू होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार तसेच पुणे-इंदौर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर देखील इंडिगो दिवाळीच्या आधीच म्हणजे २७ ऑक्टोबर पासून आपल्या उड्डाणांची संख्या देखील वाढवणार

असे असेल उड्डाणांचे वेळापत्रक…

६ए-२५८ हे पुणे-भोपाळ विमान २७ आॅक्टोबरपासून दररोज दुपारी १ वाजता उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ६ए-२५७ हे भोपाळ-पुणे विमान दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि ४ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.