शेतकर्‍यांसाठी देशातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा शुभारंभ; काय आहेत नेमके वैशिष्ट्य?
Marathi October 08, 2024 06:24 AM

Nagpur News नागपूर : नागपुरातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या सोलर पॅनल, सोलर सेल आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील इतर यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन पार पडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेशजी सोनी हे पण कार्यक्रमात उपस्थित होते. या प्रकल्पात तब्बल 13 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 5000 पेक्षा जास्त नवे रोजगार निर्माण होतील, असा दावा केला जात आहे. तर प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठी देशातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा आज नागपूर (Nagpur News) येथे शुभारंभ झाल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

13,650 हजार कोटींची गुंतवणूक,5000 पेक्षा जास्त नवे रोजगार

आवडा ग्रुपचे प्रमुख विनीत मित्तल हे केवळ उद्योजकच नाहीत तर ते विचारवंतही आहेत. नवनवीन कल्पना समजून घेऊन त्या अंमलात आणण्याचे त्यांचे कौशल्य आहे. विनीत मित्तल यांनी महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे धोरण तयार केले. या धोरणामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. भारताला जी नवी ऊर्जा मिळणार आहे, त्यासाठीची सर्व उपकरणे येथे तयार होणार आहेत. यामध्ये 13,650 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याचे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी विशेष वीज कंपनी सुरू करणारे पहिले राज्य

शेतकऱ्यांसाठी विशेष वीज कंपनी सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आम्ही 12 हजार मेगावॅटचे काम सुरू केले. ही देशातील सर्वात मोठी सौरऊर्जा निर्मिती योजना आहे. अवघ्या 9 महिन्यात आम्ही महाराष्ट्रात 12 हजार मेगावॅटचे काम सुरू केले. तसेच आगामी काळात आणखी 4 हजार मेगावॅटचे काम आम्ही करत आहोत. अवघ्या अडीच वर्षांत आम्ही सुमारे 20 हजार मेगावॅटचे सौर प्रकल्प मंजूर करून त्यांचे काम सुरू केले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.