Narhari zirwal attack on raj thackeray KP
Marathi October 08, 2024 02:25 PM


विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केले त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे.

मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केले त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यावर आता नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंना चांगलेच प्रत्युत्तर केले आहे. मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो कारण मी आदिवासी आहे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. (Narhari zirwal attack on raj thackeray.)

हेही वाचा : मराठी : माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश – मुख्यमंत्री 

– Advertisement –

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून पेटला असताना आता आदिवासी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. धनगरांचा समावेश एसटी प्रवर्गामध्ये करु नये तसेच पेसाअंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उतरुन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिरवाळ यांच्या आंदोलनाची दखल घेतली असून त्यांनी तातडीने बैठक घेतली आहे. या बैठकीत आदिवासी मुलांची पेसा भरती न्यायालय निर्णयाच्या आधीन राहून करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो लागेल, पण आदिवासी मुलांना कामावरून काढण्यात येणार नाही. पेसा उमेदवारांची नियुक्ती मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांची नियमित नियुक्ती होणार आहे, असा तोडगा काढण्यात आला आहे.

हेही वाचा : Anandacha Shidha : गणेशोत्सवानंतर 20 दिवसांनी मिळाला आनंदाचा शिधा, नवरात्र आनंदात

– Advertisement –

विधानसभा उपाध्यक्षांना न्याय मागण्यांसाठी जाळीवर उड्या माराव्या लागत असतील, तर सर्वसामान्यांचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी नरहरी झिरवाळ यांना तसेच सत्ताधाऱ्यांना ट्रोल केल्याचे समोर आले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील पोस्ट करत झिरवाळ यांना सुनावले होते. तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना ? असे म्हणत जाळी नसलेल्या इमारतीवरुन उडी घेण्याचा सल्ला देखील त्यांनी झिरवाळ यांना दिला होता. त्यानंतर आता झिरवाळ यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, मी आदिवासी आहे. जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला, असा पलटवार नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर केला आहे.


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.