Latest Maharashtra News Updates : हरियाणातील लोकांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कमळ फुलले": पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे स्वागत केले
esakal October 09, 2024 06:45 AM
हरियाणातील लोकांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कमळ फुलले - मोदी

हरियाणातील लोकांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कमळ फुलले": पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे स्वागत केले.

महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान हे सर्व लक्षात ठेवू - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, फारुख अब्दुल्ला 86 वर्षांचे आहेत, पण त्यांनी ज्या आत्मविश्वासाने लढा दिला ते प्रशंसनीय आहे... या भव्य यशाबद्दल मी ओमर अब्दुल्ला यांचे अभिनंदन करू इच्छितो. हरियाणात आम्हाला काँग्रेसकडून आशा होती. सरकार स्थापन केले, परंतु आम्ही त्यांच्याकडून ऐकल्याप्रमाणे, मतमोजणी मंदावली होती... आम्ही काँग्रेसशी बोलू आणि हरियाणात त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले ते जाणून घेऊ जेणेकरून आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान हे सर्व लक्षात ठेवू..."

लोकांनी काँग्रेसने बोललेल्या खोट्याचा बदला घेतला - बावनकुळे

हरियाना आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालांवर, महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, "जेव्हा पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा देशातील जनतेचा विश्वास होता की केवळ पंतप्रधान मोदीच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू शकतात... मला खात्री नाही की हरियाणाच्या लोकांना काय वाटले पण मला वाटते की लोकांनी काँग्रेसने बोललेल्या खोट्याचा बदला घेतला आहे..."

हरियाना आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी - पटोले

"हरियाना आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी आहे... महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे... पंतप्रधान मोदींनी पुतळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, आणि महाराष्ट्र ते विसरू शकत नाही. सर्व उद्योग महाराष्ट्राऐवजी गुजरातला देण्यात आले, असं पटोले म्हणाले आहेत.

Mumbai Live News: धनगर आंदोलनानंतर वर्षा निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा

धनगर समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सर्व वाहनांची तसेच नागरिकांची पोलिस चौकशी करीत आहेत.

Mumbai Live News: धनगर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

वर्षा निवासस्थानी धनगर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. पोलिसांनी सर्व आंदोलनकांना ताब्यात घेतलं आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी पोहोचत आहेत.

Mumbai Live : महाविकास आघाडीचा सर्व जागांवरील तिढा सुटला; ११ तारखेला प्रेस घेऊन जाहीर करणार

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आजची बैठक संपली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व जागांचा तिढा जवळपास सुटला आहे. त्यामुळं आता 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले पत्रकारांना संबोधित करतील आणि जागा वाटप जाहीर करतील.

Mumbai Live : रामराजे निंबाळकर अखेर १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

रामराजे निंबाळकर १४ ऑक्टोबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं निंबाळकरांचं तुतारी हाती घेण्यावर आता अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

Haryana Live: हरयाणात बहुमतासह दमदार विजय मिळवल्यानंतर भाजपचा मुंबईत जल्लोष

हरयाणात ९० पैकी ५० जागांवर आघाडी मिळवल्यानं भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळं महाराष्ट्र भाजपच्यावतीनं मुंबईत जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Live Update: विविध विकासकामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.

Ajit Pawar Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योग क्षेत्रातील समस्या, आव्हानं आणि संधींवर चर्चा केली

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित उद्योजक मेळाव्यात व्यवसायाशी निगडीत विविध विषयांवर उपस्थित उद्योजकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला संवाद. उद्योग क्षेत्रातील समस्या, आव्हानं आणि संधींवर केली चर्चा.

Shivraj Singh Chouhan Live Update: हरयाणात केलेल्या विकास कामांचा परिणाम निकालातून दिसत आहे - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं हरयाणात केलेल्या विकास कामांचा परिणाम निकालातून दिसत आहे - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान.

Uddhav Thackeray Live Update: 'योजना जाहीर करत सुटलेयत, पण अंमलबजावणी नाही' - उद्धव ठाकरे Jammu Kashmir Election Live Update: जम्मू-काश्मिरमध्ये निवडणूकीमुळे लोकशाही मजबुत- देवेंद्र फडणवीस

जम्मू-काश्मिरमध्ये निवडणूकीमुळे लोकशाही मजबुत आहे असे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

नवी दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार

आज दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसने केली १८ जागांची मागणी

मुंबईत काँग्रेसने १८ जागांची मागणी केली आहे. मुंबईत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे.

Pachod: 'त्या' विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

वीस वर्षीय गर्भवती विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलीसांनी मयत विवाहीतेच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह सासु , सासरा व नणंद विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांस ताब्यात घेतले.

Yavatmal Live News: पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

यवतमाळ ते पांढरकवडाकडे जाणाऱ्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चरडे, एक्स मॅन आर्मी अशोक बोंद्रे यांनी स्वखर्चातून खड्डे बुजवून खाकितील माणुसकीचे दर्शन दिले 

CM Eknath Shinde Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तब्येत बरी नसल्या कारणाने मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत असून सोलापूर दौरा आणि राज्यमंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Tuljabhavani Mandir Live : तुळजाभवानी मंदिरात दर्शनाच्या रांगेत गोंधळ

तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात दर्शनाच्या रांगेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही तरुणींनी रांग मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ झाला.

PM Modi Live : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांन संबोधित करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ६ वाजल्यानंतर भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निकालांबाबत पंतप्रधानांच संबोधन होण्याची शक्यता असून दोन्ही राज्यातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. जे पी नड्डा यांच्या सोबतच्या बैठकीत या तयारीबाबत चर्चा होणार आहे.

जेपी नड्डा यांनी बोलवली महासचिवांची बैठक

हरियाना आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यादरम्यान हरियानामध्यो भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपने येथे बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत येथे पाच राऊंडच्या मतांचीच मोजणी झाली आहे. यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व महासचिवांची बैठक बोलवली आहे.

Nashik Live: नाशिक शहरातील ३ जागांबाबत भाजपची मुंबईत चर्चा

नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर चर्चा करण्यासाठी भाजपने आज मुंबईत बैठक बोलवली आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे, जिथे गुप्त मतदान, अंतर्गत अहवाल आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजपचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या चर्चेसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे. रात्री ९ वाजता होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

bjp live: उदगीरमधून मोठा ताफा मुंबईत दाखल, मतदार संघासाठी भाजप कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी

उदगीर येथून दीडशे गाड्यांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी आपल्या मतदार संघावर दावा करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेतृत्त्वाला भेटून त्यांनी मतदार संघ भाजपलाच सोडावा अशी मागणी केली आहे. दिलीपकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभे राहिले असून, या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांना भेटण्याची तयारी दर्शवली आहे.

MHADA Live: थोड्याच वेळात म्हाडाच्या घरांची सोडत निघणार

मुंबईतील २०३० घरांसाठी मुख्यमंत्री यांच्या हस्ते निघणार सोडत. या सोडतीसाठी १ लाख ५ हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित असणार आहेत तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार

Ayodhya live: अयोध्येतील महाराष्ट्र सदनचे आज भूमिपूजन

अयोध्येतील महाराष्ट्र सदनचे आज भूमिपूजन आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून शरयू नदीजवळ महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या २.३२७ एकर भूखंडावर बांधकाम होणार. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीराम दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सदनची निर्मिती करण्यात येणार.

Hatkanangale Police LIVE : हातकणंगले पोलिसांविरोधात अधीक्षकांकडे तक्रार

हातकणंगले : लक्ष्मीवाडी (ता. हातकणंगले) येथील राजाराम प्रभू खोत यांनी हातकणंगले पोलिस निरीक्षक व कॉन्स्टेबल यांनी जमीन खरेदी दस्त, आधार कार्ड, फोटो जबरदस्तीने मारहाण करून काढून घेतल्याची तक्रार कोल्हापूर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तक्रारीनुसार राजाराम प्रभू खोत यांनी लक्ष्मीवाडी येथील गट नंबर १५१/१ ची जमीन २०१२ ला एका शैक्षणिक संस्थेला दिली होती.

Neelam Gorhe LIVE : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे मंगळवारी (ता. ८) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता त्या अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. साडेदहा वाजता पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता त्या कराडकडे प्रयाण करतील.

Nagpur Bench LIVE : विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी नागपूर खंडपीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

नागपूर : विद्यार्थ्यांना शिक्षकांनी रागावले म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केले असे होत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. अमरावती येथील स्कॉलर्स कॉन्व्हेंट येथील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले होते. ते गुन्हे नागपूर खंडपीठाने रद्द केले.

Nana Patole LIVE : पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लाप्रकरणी नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र

नागपूर : रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडतील का? याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीचा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केलाय. ४ सप्टेंबर रोजी पटोले यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याने पटोले यांनी निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे.

Mumbai News : कंत्राटदारांचे आज राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील सर्व विभागाकडील केलेल्या विकासकामांचे कामांचे कंत्राटदार, अभियंता, मजूर संस्था व विकासक यांचे ४० हजार कोटींची बिले गेल्या चार -पाच महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ती बिले तत्काळ मिळावी यासाठी आज सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कंत्राटदार संघटनेच्या तीने आंदोलन करण्यात येणार आहे.

Suhas Joshi LIVE : सुहास जोशी यांना भावे गौरवपदक

सांगली : मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य अभिनेत्री, श्रीमती सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी यांना रंगभूमीवरील मानाचे विष्णुदास भावे गौरवपदक घोषित झाले. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

Maharashtra Government LIVE : सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित, विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन निर्णय

Latest Marathi Live Updates 8 October 2024 : पुढील महिन्यात होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी यांना रंगभूमीवरील मानाचे विष्णुदास भावे गौरवपदक सोमवारी घोषित झाले. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्यासाठी दोन निविदा आल्या आहेत. त्याची तांत्रिक छाननी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला किमान ९० जागा लढायला मिळायला हव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचे समजते. कंत्राटदार संघटनेच्या आज आंदोलन करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांची आज देवगिरी येथे बैठक होणार आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आज ११ वाजता भाषण होण्याची शक्यता आहे. शिवाय, महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.