MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिलं अन् LIC मध्ये घोटाळा? ‘पगारातून पैसे कापले जातायंत पण…’
GH News October 09, 2024 05:14 PM

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा होत असतानाच एसटी कर्मचारी भविष्याच्या अनुषंगाने देय असलेली रक्कम देण्यात सरकार उदासीन असल्याचं समोर आलं आहे. पीएफ, मेडिकल बिले, एलआयसी यासह वेगवेगळ्या सुविधा देण्यातील निधी सरकारने अद्याप दिला नसल्याने तो भरण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात आले मात्र त्याचा भरणाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारकडून जवळपास ३ हजार कोटींची रक्कम अद्याप दिली गेली नसल्याचा आरोप आकडेवारीसह महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. ‘कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात येतात मात्र जवळपास ६० कोटी रूपयांची रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाकडून अद्याप भरण्यात आलेली नाही. जर एसटी कर्मचाऱ्याच्या दुर्दैवाने अपघात झाला तर या एलआयची पॉलिसीचा फायदा होणं अपेक्षित असताना मात्र एसटीने पगारातून एलआयसीचे पैसे कापले मात्र ते वेळेवर एलआयसीला भरले नाही तर तो कर्मचारी डिफॉल्टर ठरेल मग त्याला फायदा कसा मिळेल?’, असा सवाल महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलाय.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.