PAK vs ENG : जो रुट सुसाट, पाकिस्तान विरुद्ध विक्रमी शतक, सुनील गावस्कर यांच्यासह एका चौघांचा रेकॉर्ड ब्रेक
GH News October 09, 2024 07:14 PM

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलं आहे. जो रुट याने या शतकासह अनेक विक्रम उद्धवस्त केले आहेत. जो रुट याने 167 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने आणि 59.9 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. जो रुट याचं हे कसोटी कारकीर्दीतील 35 वं शतक ठरलं. रुटने यासह 4 दिग्गज आणि माजी कर्णधारांना मागे टाकत इतिहास घडवला आहे. तसेच जो रुट याचं हे 51 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलंय. रुट सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणारा विराट कोहली याच्यानंतरच दुसरा सक्रीय फलंदाज ठरला आहे.

रुटने चौघांना पछाडलं

रुटने महेला जयवर्धने, ब्रायन लारा, दिग्गज सुनील गावस्कर आणि युनूस खान या चौघांना मागे टाकलं आहे. या चौघांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी एकूण 34 शतकं केली आहेत. रुटने या 35 व्या शतकासह आणखी एक कारनामा केलाय.रुट सर्वाधिक कसोटी शतकं करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर (51), जॅक कॅलिस (45), रिकी पॉन्टिंग 41, कुमार संगकारा 38 आणि राहुल द्रविडच्या नावावर 36 शतकांची नोंद आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणारे सक्रीय फलंदाज

दरम्यान सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणाऱ्या सक्रीय फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने आतापर्यंत एकूण 80 शतकं झळकावली आहे. जो रुटचं हे 51वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलंय. रोहित शर्मा 48, केन विलियमसन 45 तर स्टीव्हन स्मिथ याने 44 वेळा शतक केलं आहे.

दरम्यान पाकिस्तान पहिल्या डावात कर्णधार शान मसूद 151, आघा सलमान नाबाद 104 आणि अब्दुल्ला शफीक याच्या 102 धावांच्या जोरावर सर्वबाद 556 धावा केल्या. इंग्लंडने त्या प्रत्युत्तरात तिसऱ्या सत्रात 400 धावांचा पल्ला गाठला आहे.

रुटचा आता द्रविडच्या विक्रमावर डोळा

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.