PAK vs ENG: हॅरी ब्रूकचं पाकिस्तान विरुद्ध सलग चौथं शतक, इमरान खानचा रेकॉर्ड ब्रेक
GH News October 09, 2024 09:14 PM

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाहुणे एकदम जोरात आहेत. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने 35 वं विक्रमी कसोटी शतक करत 4 माजी कर्णधारांना मागे टाकलं. रुटनंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूक यानेही शतक झळकावलं आहे. ब्रूकचं हे कसोटी कारकीर्दीतीलं सहावं शतक ठरलंय. तसेच ब्रूकने पाकिस्तान विरुद्ध हे सलग चौथं शतक पूर्ण केलं आहे. ब्रूकने या शतकासह इमरान खानचा रेकॉर्ड ब्रेक केला.तसेच ब्रूक या शतकी खेळीदरम्यान भाग्यवान ठरला. ब्रूक स्टंपला बॉल लागूनही आऊट झाला नाही.

ब्रूकने तिसऱ्या दिवशी तिसऱ्या अर्थात अंतिम सत्रात हे शतक पूर्ण केलं. इंग्लंडने तिसरी विकेट गमावल्यानंतर ब्रूक मैदानात आला. ब्रूकने अवघ्या 49 चेंडूत अर्धशतक झळकावंल. त्यानंतर 118 बॉलमध्ये ब्रूकने 1 सिक्स आणि 8 फोरच्या मदतीने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. ब्रूकने याआधी 2022 च्या पाकिस्तान दौऱ्यातील कसोटी सामन्यांमध्ये शतकं केली होती. ब्रूकने त्यापैकी एक शतक मुल्तानमध्ये केलं होतं. आता ब्रूकने पुन्हा एकदा मुल्तानमध्ये शतक केलंय. ब्रूकने यासह पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं करण्याबाबत मोहिंदर अमरनाथ आणि अरविंदा डिसिल्वा यांच्या विक्रमाची बरोबरी केलीय. अमरथान यांनी 18 आणि अरविंदा डी सिल्वाने 17 डावांमध्ये 4 शतकं केली होती. तर हॅरीने पाकिस्तान विरुद्ध फक्त 6 डावात 4 शतकं केलीत.

इमरान खानचा रेकॉर्ड ब्रेक

हॅरी ब्रूकने पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान याचा विक्रमही उद्धवस्त केलाय. इमरान खान याने कसोटी कारकीर्दीत फक्त 3 शतकंच केली होती. इमरानने विंडिज विरुद्ध 1980 साली 123 धावांची खेळी केली होती. 1983 आणि 1989 साली टीम इंडिया शतक केलं होतं. इमरानने फैसलाबादमध्ये 1983 मध्ये 117 तर कराचीत 1989 साली 109 धावा केल्या होत्या.

हॅरी ब्रूकचे पाकिस्तानमधील 4 शतकं

2022 – रावळपिंडी 2022 – मल्तान 2022 – कराची 2024 मुल्तान

भाग्यवान हॅरी ब्रूक

हॅरी ब्रूक या शतकी खेळी दरम्यान भाग्यवान ठरला. स्टंपला बॉल लागूनही हॅरी ब्रूक वाचला. हॅरीने आमिर जमालने टाकलेला बॉल डिफेंड केला. मात्र बॉल त्यानंतर ब्रूकच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर ब्रूक स्वत:चा बचाव करत असताना बॉल जाऊन स्टंपला लागला. मात्र बेल्स न पडल्याने ब्रूक वाचला. ब्रूक तेव्हा 75 धावांवर खेळत होता.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.