IND vs BAN: 4,4,4,6,6,6,6,नितीश कुमार रेड्डीचा 27 बॉलमध्ये अर्धशतकी तडाखा, बांगलादेशची धुलाई
GH News October 09, 2024 11:12 PM

टीम इंडियाचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये चौफेर फटकेबाजी करत पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं आहे. नितीशने बांगलादेश विरूद्धच्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यात पदार्पण केलं होतं. नितीशने त्या सामन्यातही नाबाद 16 धावा केल्या होत्या. मात्र तोवर विजयी आव्हान पूर्ण झाल्याने त्याला नाबाद परतावं लागलं होतं. मात्र नितीशने या दुसऱ्या सामन्यात निर्णायक क्षणी रिंकु सिंहला अप्रतिम साथ देत स्फोटक अर्धशतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं आहे. नितीशने अवघ्या 27 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 185.19 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं.

नितीशची विस्फोटक बॅटिंग

टीम इंडियाने स्फोटक सुरुवातीनंतर पावरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या. संजू सॅमसन 10, अभिषेक शर्मा 15 आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव 8 धावांवर बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 5.3 ओव्हरमध्ये 3 आऊट 41 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकु सिंह या दोघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली आणि बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं. नितीशने त्यानंतर आणखी आक्रमकतेने खेळत अर्धशतक ठोकलं. नितीशने अर्धशतकानंतर धावांचा वेग आणखी वाढला.

नितीशने त्यांनतर पुढील 7 बॉलमध्ये 24 धावा जोडल्या. नितीश ज्या पद्धतीने खेळत होता, त्यानुसार त्याला शतक करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र नितीश 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्ससह 74 धावा करुन माघारी परतला. मात्र तोवर नितीशने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मुस्तफिजुरने नितीशला मेहदी हसन मिराजच्या हाती कॅच आऊट केलं.

नितीश कुमार रेड्डीची फटकेबाजी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.