'कापडी पिशवी' स्पर्धेत सहभागाचे आवाहन
esakal October 10, 2024 12:45 AM

‘कापडी पिशवी’ स्पर्धेत
सहभागाचे आवाहन
ओरोस, ता. ९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी कापडी पिशवी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. टाकाऊ घटकापासून टिकाऊ निर्माण केलेली पिशवी, बहुपयोगी पिशवी आणि आकर्षक पिशवी अशा प्रकारची ही स्पर्धा असून, यामध्ये कोणत्याही गटातील नागरिक सहभागी होऊ शकतो. १५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरणस्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, शिवाजी वाचन मंदिर मालवण, शारदा ग्रंथालय कसाल, स्वावलंबी भारत अभियान सिंधुदुर्ग व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका एका लखोट्यात अथवा पिशवीत घालून त्यावर आयोजक, कापडी पिशवी स्पर्धा २०२४ असे लिहून आपला पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांकासहित पणदूर (ता. कुडाळ) येथे अभिनव गुरव यांच्याकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह सहभागी होऊ शकतो. स्पर्धेसाठी वैभववाडी-रुपेश सुर्वे, दोडामार्ग-विठ्ठल गवस, धुदुर्गनगरी-शरद खरात, सावंतवाडी-सुधीर कशाळीकर, माणगाव-आशिष पाडगावकर, कसाल-भूषण साप्ते, वैभववाडी-प्रशांत कुळये, वेंगुर्ले-संजय शिरसाट, मालवण-श्रुती गोलतकर, विजयदुर्ग-विवेक माळगावकर, शिरोडा-सागर रेडकर येथे प्रवेशिका द्याव्यात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.