BEED NEWS: बीडमध्ये दोन दसरा मेळावे! भनवान भक्तिगड आणि नारायण गडावरवर जमणार लाखोंचा जनसमुदाय
Times Now Marathi October 10, 2024 05:45 AM

Beed Dussehra Melava : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात यंदा दोन मोठे दसरा मेळावे होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी दोन ठिकाणे सज्ज झाली आहेत. यातील एक मेळावा पंकजा मुंडें यांचा आहे. हा मेळावा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घट येथे होणार आहे, तर दुसरा दसरा मेळावा मनोज जरांगे यांचा होणार असून तो बीड जिल्ह्याच्या नारायण गडावर तब्बल 500 एकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घट येथे होणार आहे. याला भगवान भक्तिगड म्हणून ओळखले जाते. जागर भक्तीचा..सागर शक्तीचा अशी या मेळाव्याची टॅगलाईन आहे. भगवान भक्तीगड या ठिकाणी तब्बल 18 एकर क्षेत्रावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार असून त्यासाठी जय्यत अशी तैयारी सुरू आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडें यांनी हा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली होती, त्यांच्या पश्चात त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास लाखोंचा जनसमुदाय येत असतो. यंदाही तेवढ्याच मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.





मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच बीड येथील नारायण गडावर 500 एकर जागेमध्ये दसऱ्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संखेने मराठाबांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नारायण गडावर देखील मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.





विधानसभेच्या दृष्टिकोणातून दोन्ही मेळाव्यांना महत्त्व
बीड जिल्हयात होत असलेल्या दोन दसरा मेळाव्यांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या मेळाव्याला संबोधित करताना कोणते निर्णय घेतले जाणार? कोणते गणित बांधले जाणार? कोणाचे किती शक्ती प्रदर्शन होणार? अशी चर्चा आता रंगली आहे. राज्यात मराठा आऱक्षणामुळे मराठा आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. विधनसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या मेळाव्यांचे पडसाद आगामी निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.